बीड : विकास कोण करतो ? हे जनतेला चांगलेच ठावूक आहे़ निवडणुका आल्या की केवळ जनतेपुढे आरडाओरड करायची आणि विरोधासाठी विरोध करायचा़ परंतु अशा लोकांना आता जनताच धडा शिकवेल, अशा शब्दात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी विरोधकांवर पलटवार केला़येथील नवीन बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते़ राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आ़ सय्यद सलीम, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अॅड. डी. बी. बागल, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सर्जेराव काळे, अरूण डाके, अॅड. शेख शफीक, आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री क्षीरसागर म्हणाले की, २०१२ पासून मी स्वत: बीडच्या बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न करत होतो़ एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याकडे येथील बसस्थानकाच्या नूतनीकरण प्रस्तावासंदर्भात मी विनंती केली होती. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन काम मार्गी लावले़ नूतन बांधकामासाठी १६ कोटी १२ लक्ष रूपयाचा निधी मिळाला आहे.क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यशबीड बसस्थानक नुतनीकरणाचा पालकमंत्री जयदत्त क्षीरसागरांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे मी अनेकवेळा मंत्रालयात पाहिले आहे. मी केवळ प्रस्ताव बनवून राज्य शासनाकडे पाठविण्याचे काम केले आहे. मात्र प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे काम क्षीरसागरांनी केले आहे. त्यांच्यामुळेच नवीन बसस्थानकाची इमारत होत आहे, असे सांगून जीवनराव गोरे पुढे म्हणाले की, नेत्यांनी सहा महिन्यातून एकदा तरी आमच्या बसगाडीने प्रवास करावा. यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांवर देखील लक्ष राहिल व एसटीच्या समस्या देखील तुमच्या लक्षात येतील, अशी अपेक्षा गोरे यांनी यावेळी व्यक्त केली.लॉलीपॉप लागणाऱ्या नेत्यांना विकास काय समजतो ?संपूर्ण जिल्हयात असो की बीड विधानसभा मतदार संघात असो, विकास कोण करते हे जनतेला चांगले माहित आहे. ज्यांना पनवेल ते बीड प्रवासात लॉलीपॉप लागते, त्यांना विकास काय कळणार, असा टोला यावेळी पालकमंत्री क्षीरसागर यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
करणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवेल !
By admin | Updated: August 25, 2014 01:39 IST