शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्ससाठी आता आॅनलाईन अपॉइन्टमेन्ट

By admin | Updated: August 13, 2014 00:52 IST

उस्मानाबाद : नागरिकांना लायसन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायदयानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते,

उस्मानाबाद : नागरिकांना लायसन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायदयानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते, त्यासाठी नागरिकांना कार्यालयात तासनतास रांगेत उभे राहवे लागत होते. नागरिकांचा हा वेळ आता वाचणार आहे. लायसन्स काढण्यासाठी आॅनलाईन फॉर्म भरुन अपॉइन्टमेन्ट घेतल्यास लगेच लायसन्स काढता येणार असून, याची सुरुवात जिल्ह्यात १९ आॅगस्ट पासून होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रैवार यांनी दिलीे.प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे ओरिएंट कन्सल्टन्सी यांनी विकसित केलेली शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रणाली सुरु करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी नागरिकांना परिवहन कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परिक्षा द्यावी लागत होती. मात्र आता दैनंदिन कामकाजात जे उमेदवार शिकावू अनुज्ञप्तीसाठी अपॉइंटमेट सह हजर राहतील, त्यांचे करिता रांगेत प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांनी लायसन्स काढण्यासाठी आॅनलाईन फॉर्म भरला आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. क्षमतेच्या ५० टक्के उमेदवार संख्या ही आॅनलाईन अपॉइटमेंटसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सदर पध्दत जनतेमध्ये रुळल्यानंतर हळृूहळू आॅनलाईन अपाँइटमेंटसाठी ९० टक्के पर्यंत उमेदवारसंख्या वाढविण्याच्या सूचना प्रधान सचिव परिवहन यानी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आॅनलाईन लायसन्स सेवेचा प्रारंभ १९ आॅगस्ट पासून करण्यात येणार असल्याचे संजय म्हेत्रैवार यांनी सांगितले. एनआयसी कार्यालयाने परिवहन कार्यालय संपूर्णपणे आॅनलाईन केल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)