शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

अवमान याचिकेच्या अनुषंगाने ‘त्या’ शैक्षणिक संस्थाचालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:33 IST

: विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व भत्ते देण्यास नकार दिल्यामुळे दाखल झालेल्या ‘अवमान याचिके’च्या अनुषंगाने चिकलठाणा येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी आणि महाराष्ट्र पब्लिक स्कूल, या शैक्षणिक संस्थेचे चालक डॉ. विश्वनाथ कराड आणि मेजर जी. के. घुगे यांच्यासह एकूण सात पदाधिका-यांना ‘न्यायालयाच्या अवमानाची’ नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या.मंगेश पाटील यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व भत्ते देण्यास नकार दिल्यामुळे दाखल झालेल्या ‘अवमान याचिके’च्या अनुषंगाने चिकलठाणा येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी आणि महाराष्ट्र पब्लिक स्कूल, या शैक्षणिक संस्थेचे चालक डॉ. विश्वनाथ कराड आणि मेजर जी. के. घुगे यांच्यासह एकूण सात पदाधिका-यांना ‘न्यायालयाच्या अवमानाची’ नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या.मंगेश पाटील यांनी दिले आहेत.खंडपीठाची नोटीस जारी झालेल्यांमध्ये स्वामी विवेकानंद अकॅडमीचे डॉ. सुरेश घैसास, प्रा. एच. एम. गणेशराव आणि वृंदा एस. पाठक (सर्व राहणार पुणे) यांचा तसेच महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे नीलाक्षी गंगाधर घुगे आणि मुख्याध्यापिका माधुरी लक्ष्मीकांत दौंड यांचाही समावेश आहे.राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे सर्वव्यापीकरण व प्रसार करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे शपथपत्र देणाºया शिक्षण संस्थांना विनाअनुदान तत्त्वावर शाळा चालविण्याला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. या शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. शासकीय व अनुदानित शाळेतील कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन व भत्ते दिले जातात. मात्र विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना एकसमान काम करूनही समान वेतन दिले जात नाही. त्याविरोधात महाराष्ट्र पब्लिक स्कूल, स्वामी विवेकानंद अकॅडमी यांच्यासह विविध शाळेतील शिक्षकांनी अ‍ॅड. बी. एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने नोटीस बजावल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित कायद्यात व नियमात बदल करून विधिमंडळाच्या संमतीने विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू केले. यावरून वेतनाच्या फरकाची रक्कम निश्चित करून ती सहा महिन्यांत अदा करावी, असे आदेश खंडपीठाने दिले होते. मात्र आदेशाचे पालन झाले नाही म्हणून अनिल काळे व छाया दवे यांनी अवमान याचिका दाखल केली आहे.