शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नोटीसधारकांची होतेय धावपळ

By admin | Updated: July 11, 2017 23:46 IST

सेनगाव : तहसील कार्यालयाने शहरातील ५०० हून अधिक नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तहसील कार्यालयाने शहरातील ५०० हून अधिक नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, नोटीसधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोटिसांचा खुलासा करण्यासाठी जुने पुरावे गोळा करण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे. येथील नगरपंचायत हद्दीत असणारा गट नं. ९५६ या जमिनीच्या क्षेत्रांची महसूल दप्तरी शासनाच्या नावाने नोंद आहे. या ४ हेक्टर ८५ आर जमिनीवर मागील ६० ते ७० वर्षांपासून जवळपास ३५० घरांचे इंदिरा नगर वसलेले आहे. त्याशिवाय शासकीय कार्यालये, नगरपंचायत, शाळा, आठवडी बाजार, नगरपंचायतीचे गाळेधारक आहेत. या सर्वांना तहसील कार्यालयाने ८ जुलै रोजी अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या असून, या गटात उभारलेली घरे, दुकाने यासंबंधी आठ दिवसांत जागेचे पुरावे सादर करण्याचे दिले आहेत. १५ जुलैनंतर अतिक्रमणावर थेट कारवाई करण्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. पुरावे सादर करण्याची मुदत चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत इंदिरा नगरातील गोरगरीब नागरिक, रोजमजुरी बुडवत जुने कागदपत्रे, पुरावे शोधण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. प्रशासनाने येथील नगरपंचायत कार्यालयाला नोटीस बजावून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. ६० ते ७० वर्षांपासून वास्तव्य असणाऱ्या गरीब कुटुंबांना या कारवाईत टारगेट करण्यात आल्याने नागरिकांत, व्यापाऱ्यांत या कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण शहरात केवळ अतिक्रमणाच्या नोटिसीची चर्चा होत आहे. गट नं. ९५६ ही जमीन शहराच्या मध्यभागी असून, नगरपंचायत स्थापनेपूर्वी या जमीन क्षेत्रावर प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयाचा ताबा राहीला. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ही जमीन नगरपंचायत कार्यालयाच्या अखत्यारित आली; परंतु महसूल रेकॉर्डला याची कोणतीही नोंद निर्धारित वेळेत झाली नसल्याने हा गोंधळ उडाला आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई या प्रकारामुळे वेगळ्या वळणावर गेली असून, आमच्या घरांचे काय होणार? असा एकच प्रश्न नागरिक विचारत आहेत.