शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांना अवमानप्रकरणी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:37 IST

खंडपीठाच्या आदेशाची पूर्तता न झाल्यामुळे दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशाची पूर्तता न झाल्यामुळे दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०१७ रोजी होणार आहे.२०१४ साली हर्सूल तलावात पोहण्यास गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा ठराव महापालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता; मात्र २०१६ पर्यंत महापालिकेकडून आर्थिक मदत न मिळाल्यामुळे सय्यद फैजुद्दीन व इतर यांनी २०१६ मध्ये वरील आर्थिक मदत मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने ती याचिका मंजूर करून ठरावाप्रमाणे आर्थिक मदत तीन महिन्यंत संबंधितांना देण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. त्या आदेशाची पूर्तता झाली नाही. म्हणून याचिकाकर्त्यांनी मनपा आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रमीज मकसूद शेख काम पाहत आहेत.