शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्याने कापले शहराचे नाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:14 IST

अभिनेता सुमित राघवनने स्थानिक नाट्यगृहांची दयनीय अवस्था फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला.

औरंगाबाद : शहरातील नाट्यगृहांची दुरवस्था शतदा समोर आणूनही मनपा प्रशासन ढिम्म ते ढिम्मच! शहरातील नागरिक ओरडून ओरडून थकल्यानंतर आता अभिनेता सुमित राघवनने स्थानिक नाट्यगृहांची दयनीय अवस्था फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला.एका नाटकाच्या प्रयोगानिमित्त ते शनिवारी (दि.६) शहरात आले होते. नाटकाची टीम संत एकनाथ रंगमंदिरात पोहोचली तेव्हा तुटलेल्या खुर्च्या, मोडलेला रंगमंच, अस्वच्छता, मेकअप रूमची दुरवस्था, स्वच्छतागृहांची दुर्गंधी, अशी विदारक स्थिती पाहून चकितच झाली. रंगमंचाची विटंबना सहन न झाल्याने त्यांनी लागलीच तेथून फेसबुकवर या सर्व परिस्थितीचे चित्रण लाइव्ह दाखविण्यास सुरुवात केली.तो म्हणतो, ‘आम्ही कलाकार १२-१२ तास प्रवास करून येथे आलो आणि अशा ठिकाणी आम्हाला प्रयोग करावा लागत आहे. आमच्या महिला कलाकार तर मेकअप रूममध्ये जाण्यासही तयार नाहीत, एवढी वाईट स्थिती आहे.’ या व्हिडिओमध्ये मग तो दुभंगलेले स्टेज, कुशन निघालेल्या खुर्च्या, जिकडे-तिकडे पडलेला कचरा, भिंती व दरवाजामागे थुंकलेले, स्वच्छतागृहातील अस्वच्छता दाखवतो.संत एकनाथ रंगमंदिराला दुर्लक्षित नाट्यगृह संबोधून तो म्हणतो की, ‘आम्ही जेव्हा येथील कर्मचाºयाला पडलेला कचरा दाखवला तेव्हा त्याने ‘या वेळेला माणसे मिळत नाहीत’, असे कारण सांगून मोकळा झाला.’ यापूर्वी प्रशांत दामले यांनी स्वत: झाडू मारून नाट्यगृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. मध्यंतरी शहरातील नाट्यप्रेमी व कलाकारांनीसुद्धा एकत्र येऊन मनपाला नाट्यगृहांबाबत निवेदन दिले होते.