व्यंकटेश वैष्णव , बीड ज्यांचं आयुष्य म्हणजे काटेरी कुंपणावरील राजतलम वस्त्र होते़ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गळ्यातला ताईत असणारे गोपीनाथ मुंडे यांचे वैभव होते ते म्हणजे तळागाळातील कार्यकर्ता़ आज हा कार्यकर्ता पोरका झाला असल्याचा प्रत्यय मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राला आला़ १९७० च्या दशकापासून पुणे येथून विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या राजकारणात सक्रिय सहभागी झालेले गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास कधीच सोपा राहिलेला नाही़ १९७७ दरम्यान आणीबाणी लागू झाल्यानंतर पोलिसांनी मुंडे यांना अटक केली व नाशिकच्या कारागृहात सोळा महिने त्यांनी कारावास भोगला. राजकीय कारकिर्दीत अनेक स्थित्यंतरे गोपीनाथराव मुंडे यांनी सहजरीत्या हाताळली. ज्यांनी पक्षांतर्गत बंडाळीला तोंड दिले. ज्यांनी आपले राजकीय मार्गदर्शक असलेल्या महाजनांच्या निधनाचे दु:ख पचविले. अन् पुन्हा मोठ्या जोमाने पक्षाला व महाजन परिवाराला सावरले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी गोपीनाथ मुंडे यांची नाळ जुळलेली असल्यामुळे विरोधी पक्षातील कार्यकर्तेही मुंडेंच्या शब्दाबाहेर कधी गेलेले नाहीत हा इतिहास उभ्या महाराष्टÑाने आजवर अनेकवेळा अनुभवलेला आहे. १९७८ ला त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथून जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक ते लढले आणि विजयी झाले. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास हा एखाद्या झंझावाताप्रमाणे सुरू झाला. महाराष्टÑातील गावागावात त्यांनी कार्यकर्ते उभे केले. त्यानंतर औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराकरीता झालेल्या लढ्यामध्ये ते अग्रेसर राहिले. नामांतरासाठीच्या ‘लाँग मार्च’मध्ये त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. अनेक वेळा सत्याग्रह व कारावास त्यांनी भोगला. १९८४ ते ८६ दरम्यान मंडल आयोग लागू करण्यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांनी समर्थपणे केले. त्यांच्या या आंदोलनामुळेच देशात मंडल आयोग लागू झाला. ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे शेतकर्यांच्या हक्कासाठी गोपीनाथ मुंडे यांनी आंदोलन केले. या दरम्यान त्यांना पंधरा दिवसांचा कारावास झाला होता. १९८० ला रेणापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली व विजय खेचून आणला. ८२ पर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९८५ ला भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी अख्खा महाराष्टÑ ढवळून काढला. या दरम्यान, दुष्काळी ज्वारी परिषद दुध आंदोलन व राज्यस्तरीय प्रश्नांवर मुंबई आणि नागपूर विधिमंडळावर त्यांनी काढलेले मोर्चे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. १० मार्च १९८८ रोजी २ लाख शेतकर्यांचा मुंबई मंत्रालयावर मोर्चा नेणारे गोपीनाथ मुंडे हे पहिलेच राजकीय नेतृत्व होते. इतर क्षेत्रातील पिचलेल्या अन् दुर्लक्षित असलेल्या घटकांसाठी लढा देत असताना ते शेतकर्यांना कधीही विसरले नाहीत. शेतकर्यांच्या कर्ज मुक्तीची चळवळ त्यांनी १९८९ ला सुरु केली. या दरम्यान त्यांनी सहकारी चळवळीला एक नवा आयाम दिला. त्यामुळे जेव्हा- जेव्हा महाराष्टÑाच्या राजकारणाच्या इतिहासाची पाने उलटली जातील तेव्हा तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. अन् बीड भाजपा कार्यालय झाले सुने सोमनाथ खताळ ल्ल बीड ज्या भाजपाच्या बीड कार्यालयावर एक महिन्यापूर्वी भाजपा कार्यकर्त्यांनी बीड लोकसभा निवडणूकीची रणनीती आखली. त्याच भाजपा कार्यालयावर मंगळवारी शोककळा पसरली होती. सकाळी आठची वेळ होती. कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयाकडे रीघ लागली होती. नेमके काय घडतय हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते. कार्यकर्ते मात्र धाय मोकलून रडत होते. जिल्ह्याचं उमदं नेतृत्व, जिल्ह्याचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाल्याचे वृत्त देशासह बीड जिल्ह्यातील गावागावात वार्यासारखे पोहचले. गावागावातील छोट-छोटी दुकाने देखील बंद केली जात होती. बीड येथील भाजपाच्या पक्ष कार्यालयावर कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. सगळीकडे शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. ज्या भाजप कार्यालयावर पंधरा दिवसापुर्वी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या विजयाचा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला. त्याच भाजप कार्यालयावर व त्याच कार्यकर्त्यांवर आपल्या नेत्याच्या निधनाची बातमी कळाल्याने कार्यकर्ते सुन्न झाले होते. शहरातील चौका-चौकात कार्यकर्ते व नागरिकांनी एकच गर्दी केली होती. हे घडलेच कसे असे शब्द प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर पडत होते. गोपीनाथ मुंडे यांनी कायम तळागळातल्या कार्यकर्त्यांला उभा रहायला शिकविलेले आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचा ‘नाथ’ हरवला
By admin | Updated: June 4, 2014 01:30 IST