शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:48 IST

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. यावेळेस उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व इतर कागदपत्रे दाखल करण्यासाठी सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र हे आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचे यापूर्वीच निर्देश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. यावेळेस उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व इतर कागदपत्रे दाखल करण्यासाठी सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र हे आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचे यापूर्वीच निर्देश दिले आहेत.आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरताना शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर स्वत:ची नोंदणी करुन उपलब्ध करुन घ्यावी व नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रात माहिती भरावी. या माहितीची प्रिंटआऊट काढून हार्ड कॉपी व त्यावर स्वाक्षरी करुन ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत दाखल करावे. अशाप्रकारे भरलेले व स्वाक्षरी केलेले नामनिर्देशनपत्रच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मालमत्ता व दायित्व तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत शपथपत्र हे आॅनलाईनमार्फतच भरणे आवश्यक आहे.नामनिर्देशनपत्र सादर करताना अनामत रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात रोखीने भरुन त्याची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराला अराखीव प्रभागासाठी ५ हजार रुपये, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती राखीव प्रभागासाठी २५००, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २५००, महिलांसाठी २५०० रुपये अनामत रक्कम आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविणाºया उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास उमेदवाराची जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केलेल्या अर्जाच्या पोचपावतीची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.नामनिर्देशनसोबतचे दाखल करावयाचे शपथपत्र हे स्टॅम्प पेपरवर देण्याची आवश्यकता नाही. साध्या कागदावर तयार करुन सक्षम अधिकाºयाकडे नोटरी करुन ते सादर करता येईल. तसेच अर्ज दाखल केलेल्या दिनांकापासून खर्चाचा तपशील दररोज दाखल करणे आवश्यक आहे.निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. उमेदवार पक्षातर्फे निवडणूक लढवित असल्यास त्या पक्षाचे अध्यक्ष, सचिव किंवा अन्य पदाधिकाºयांनी दिलेले जोडपत्र-२ व जोडपत्र-१. विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारी मागे घेताना अर्ज आॅनलाईन देता येणार नाही.