शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकही रस्ता डांबरीकरणाशिवाय राहू देणार नाही- संतोष दानवे

By admin | Updated: March 29, 2016 00:35 IST

भोकरदन : भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे मागील १३ वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गांभिर्याने लक्ष न दिल्यामुळे सदर

भोकरदन : भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे मागील १३ वर्षांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी गांभिर्याने लक्ष न दिल्यामुळे सदर रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्राधान्यक्रमानुसार आराखडा तयार केलेला आहे. सदर आराखड्यानुसार आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन्ही तालुक्यातील एकही रस्ता डांबरीकरणाशिवाय राहू देणार नाही, असे प्रतिपादन आ. संतोष दानवे यांनी केले.वडोद तांगडा व वाढोणा येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी रविवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजना २०१४-१५ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ६० लाख रुपये किंमतीच्या वडोद तांगडा ते वालसावंगी फाटा रस्त्याच्या डांबरीकरण कामासह गावांतर्गत सिमेंट काँक्रिट रोड व समाजकल्याण विभागाच्या वतीने दलितवस्तीत मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रोडचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच अजिंठा-बुलडाणा रोड ते कालिका माता संस्थान या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचेही भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून कृउबा सभापती कौतिकराव जगताप, सिद्धेश्वर कारखान्याचे गणपत बाबा सपकाळ, विलास आडगावकर, डॉ. प्रमोद कुलकर्णी, अ‍ॅड. विरेंद्र देशमुख, वालसावंगीचे सरपंच बाळूसेठ आहेर, धावड्याचे सरपंच बेलाप्पा पिसोळे, विझोऱ्याचे सरपंच सुभाष पा. गावंडे, भोरखेड्याचे सरपंच सोनुने, दामूअण्णा सपकाळ, डॉ. हेमंत सपकाळ, अण्णा पा. सोनुने, विलास भोंबे, इकबालखा पठाण, पदमसिंग राजपूत, श्रीरंग पा. खडके, सुखलाल बोडखे, रामदास शिरसाठ आदींची उपस्थिती होती.आ. संतोष पाटील दानवे म्हणाले की, वास्तविक जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा केवळ वडोद तांगउा ते वालसावंगी फाटा व अजिंठा-बुलडाणा रोड ते कालिका माता मंदिर या दोनच रस्त्यांवर खर्च न करता मला चार-पाच लाखांची पंधरा वीस कामे मंजूर करून त्याद्वारे १५ गावांमध्ये विकासकामे मंजूर करता आली असती. परंतु मी तसे न करता या केवळ दोनच कामांवर प्रत्येकी ६० व ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)