शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

कोल्ड स्टोअरजेचे नवे यंत्र मिळेना, जुने यंत्र बसविण्यास तज्ज्ञ भेटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. परंतु अद्यापही छावणी आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाला कोल्ड ...

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. परंतु अद्यापही छावणी आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाला कोल्ड स्टोअरेजची प्रतीक्षाच करावी लागत आहे. एकीकडे महिना उलटूनही नवे यंत्र मिळत नाही. तर दुसरीकडे जुने यंत्र बसविण्यासाठी तज्ज्ञ माणसे मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी सध्या एकाच स्टोअरजेवर आरोग्य विभागाची मदार आहे.

शहरात आजघडीला सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांत वाक इन फ्रीजर आणि वाक इन कुलर आहे. या दोन्हींची क्षमता प्रत्येकी १२ क्युबिक मीटर आहे.

लस प्राप्त झाल्यानंतर येथेच साठवणूक केली जात आहे आणि येथूनच वितरण केले जात आहे. औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे आहेत. या जिल्ह्यांसह लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यांना औरंगाबादेतून लसींचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने शहरातील छावणी परिसरा प्रत्येकी २० क्युबिक मीटर क्षमतेचे लस साठवणुकीचे २ युनिट (स्टोअर) तयार करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक बांधकाम, रंगकाम करण्यात आले. प्रत्यक्षात यंत्र मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. हे यंत्र दिल्लीहून प्राप्त होणार आहे. परंतु यंत्राकडे डोळे लावून बसण्याचीच वेळ येत आहे.

त्याबरोबर आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या तळमजल्यात १६ क्युबिक मीटर क्षमतेचे स्टोअरेज करण्यात येत आहे. त्यासाठी जुने यंत्र आणि अत्यावश्यक साहित्यही उपलब्ध आहे. परंतु हे यंत्र बसविण्यासाठी माणसे मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या केवळ या स्टोअरजेचा केवळ सांगाडा उभा आहे.

लवकरच काम पूर्ण

दिल्लीहून लवकरच नवे यंत्र प्राप्त होणार आहे, तर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील यंत्रही लवकरच कार्यान्वित होईल. पुढील टप्प्यात अधिक लसी लागणार आहे. तोपर्यंत या दोन्ही स्टोअरचे काम पूर्ण होईल.

- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक