शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘अकृषक परवान्यासाठी एन ए-४४ करण्याची अट शिथिल’

By admin | Updated: August 17, 2016 00:51 IST

औरंगाबाद : अकृषक परवान्यासाठी एन ए-४४ करण्याची अट शिथिल करण्यात आलेली असून आता मनपा हद्दीत एनएची आवश्यकता नसल्याचे आज येथे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.

औरंगाबाद : अकृषक परवान्यासाठी एन ए-४४ करण्याची अट शिथिल करण्यात आलेली असून आता मनपा हद्दीत एनएची आवश्यकता नसल्याचे आज येथे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले. ते म्हणाले, मनपा व नगरपालिकांचा विकास नियोजन आराखडा असल्यामुळे या भागातील क्षेत्रांमध्ये बांधकामांसाठी एनएची आवश्यकता राहिलेली नाही. मनपा व नगरपालिकांकडून बांधकाम परवानगी घेतल्यानंतर तहसीलदारांकडून अकृषक परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने शहरी भागातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि नियोजन विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने जमीन महसूल अधिनियमाच्या प्रक्रियेसह नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यापुढे सहा ते आठ विविध विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही. मनपा व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या भागाचा समावेश जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील ग्रीन झोनचा येलो झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. त्यांनी आणखी सांगितले की, राज्य सरकारने विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात स्थित असलेल्या जमिनीच्या अकृषक वापरासाठी महाराष्ट्र जमीन महसूलसंहिता १९६६ च्या कलम ४२ व ४४ खालील परवानगीची आवश्यकता राहिलेली नाही. त्याबाबत महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे. वर्ग-१ च्या जमिनीच्या अकृषक परवान्यासाठी तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार मनपा व नगरपालिकांकडून बांधकामाची परवानगी अर्ज सादर केल्यास महिनाभरात अकृषक शुल्क जमा करून ही परवानगी दिली जाईल.