शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

ना कॉल, ना ओटीपी... तरी बॅंकेतून पैसे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:04 IST

स. सो. खंडाळकर औरंगाबाद : ना कुणी कॉल केला, ना ओटीपी मागितला, तरी बँक खात्यातून रकमा गायब होत असल्याचे ...

स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : ना कुणी कॉल केला, ना ओटीपी मागितला, तरी बँक खात्यातून रकमा गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत. मोबाइलवर फ्री गेम ॲप, ऑनलाइन पेमेंट ॲप डाऊनलोड केल्यानंतर अशी फसवणूक होत आहे. अनेट ॲपमध्ये ''ऑटो रिड ओटीपी'' परवानगी घेतली जाते. त्यातून असे प्रकार वारंवार घडत आहेत.

.............................................

*ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे....

*२०१९-८०

*२०२०-९०

*२०२१ मेअखेर-३९

*२०२० मध्ये ५७ लाख रुपयांची रिकव्हरी करण्यात आली.

* गतवर्षी १८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यात महिला आरोपींचाही समावेश आहे.

.....................

जागरूकता महत्त्वाची...

सायबर गुन्ह्यांमधून बचावण्यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. गुन्ह्यात न अडकता, आमिषांना बळी न पडल्यास फसवणूक होऊ शकणार नाही. म्हणून काळजी घ्या, सावधगिरी बाळगा.

_रवींद्र साळोखे, एसीपी, सायबर क्राइम

.....................................

पासवर्ड देऊ नका.....

''कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतःचा पासवर्ड न सांगणं हिताचं. दिवसेंदिवस सायबर क्राइमचे गुन्हे वाढत आहेत. प्रत्येकानं काळजी घेत सावध राहणं हाच सर्वोत्तम उपाय होय''

- गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम

...................................................

फसवणुकीची आकडेवारी : सोशल मीडिया

*फेसबुक/ फेक-६२

*फेसबुक इतर-९

*व्हाॅट्सॲप-२२

*ट्विटर-४

*इन्स्टाग्राम-२९

*ईद मेल हॅक-४

*सेक्सॉर्टन-९

*सोशल मीडिया इतर-३५

*एकूण : १७४

...............................

अनलाइन फ्रॉड

*लोन फ्रॉड-८

*ओटीपी फ्रॉड-२०

*फोन फ्रॉड-७९

*जॉब फ्रॉड-५

*एटीएम फ्रॉड-१५

*क्रेडिट कार्ड-८

*केवायसी फ्रॉड-१

*ओएलएक्स फ्रॉड-२

*बिझनेस फ्रॉड-७

*एकूण-१४५

.............................

सायबर क्राइममध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. वर्षाला किती पैसे लुटले जातात,याचा अंदाजही लावणे अवघडच. अधूनमधून फसवणुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की, डोळे उघडतात. आधार लिकिंगमुळे कोणाच्या खात्यावर किती पैसे हे कळणे सोपे झाले आहे. वेगवेगळी आमिषे दाखवून पैसे साफ होत असल्याचे जणू नित्याचेच झाले आहे. भविष्यात ही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तिला आळा घालण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणाही तेवढीच सुसज्ज असण्यावर भर देण्याची गरज आहे. तपासच लागत नाही म्हटल्यास गुन्हेगारीचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.