रामनगर : जालना तालुक्यातील रामनगर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत रविवारीही पीकविमा भरण्यासाठी बँक सुरूच राहील, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात रविवारी बँक बंदच राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा ुआली.अवघ्या तीन दिवसांत रामनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने ३५ लाख रुपयांचा पीकविमा हप्ता करून घेतला. पीक विमा भरण्यासाठीची अंतिम तारीख जवळ आल्याने शेतकऱ्यांची बँकेत गर्दी होत आहे. रविवारीही मोठ्या संख्येने शेतकरी विमा भरण्यासाठी आले होते. बँकेचे शाखाधिकारी नारायण गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या संदर्भात बँकेचे एफ.एन भोसले म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत बँकेच्याच कामामुळे कर्मचाऱ्यांना थांबावे लागले. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नियोजन बिघडल्याचा दावा बँकेने केला असला तरी भाटेपुरी, धांडेगाव, मानेगाव, रामनगरसह इतर गावातील शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचे बाबा भोरे, भागवत चौरे, दिनकर डोंगरे, बळीराम मोरे, विठ्ठलराव चौरे, कारभारी सरकटे, दुर्गादास सोनुने, भाऊराव गायकवाड, दिलीप गाढे, बाबा काळे, अशोक घोडकेसह शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
अन रविवारी बँक उघडलीच नाही!
By admin | Updated: July 27, 2015 01:10 IST