शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा उचलणार टी.व्ही., कपाट

By admin | Updated: July 14, 2016 01:37 IST

औरंगाबाद : मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कारवाई मनपाकडून सुरू आहे.

औरंगाबाद : मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कारवाई मनपाकडून सुरू आहे. घरगुती मालमत्ताधारकांनीही सुमारे ८५ कोटी रुपयांची थकबाकी मागील अनेक वर्षांपासून भरलेली नाही. जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडील टी. व्ही., दुचाकी वाहन, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याची कारवाई मनपाकडून करण्याचा विचार सुरू आहे.मनपा प्रशासनाने २९० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कर अदालत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही थकीत कर भरला नाही तर कायद्यातील तरतुदीचा म्हणजेच घरातील साहित्य जप्त करण्याचा विचार सुरू केला आहे. शहरातील १ लाख ३१ हजार नागरिकांनी गेल्या १० वर्षांत मालमत्ताकरापोटी एक रुपयाही मनपाकडे भरला नाही. चालू आर्थिक वर्षात मनपाने ३६८ कोटींच्या नोटिसा बजावल्या आहेत. बड्या थकबाकीदारांवर कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे. अनेक मालमत्ताधारकांना चुकीचा कर लावण्यात आल्याने नागरिक कर भरण्यास नकार देत आहेत. त्यासाठी कर अदालत घेण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या प्रभागनिहाय थकबाकीदारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातील १०० मोठ्या थकबाकीदारांना कर अदालतीसाठी बोलाविण्यात येणार आहे. मनपा आयुक्त प्रदीर्घ सुटीनंतर गुरुवारी मनपात दाखल होणार आहेत. त्यानंतर कर अदालतीच्या तारखा निश्चित होतील. निवासी मालमत्ताधारकांकडे जास्त कर थकीत असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात येणार असून, अदालतीनंतरही कर भरण्यास टाळाटाळ केली तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ नुुसार घरातील ऐवज जप्त करण्याची तरतूद आहे. टी. व्ही., दुचाकी, कपाट, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे. या अधिनियमाचा वापर करण्याच्या हालचाली मनपा प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पदाधिकारी, आयुक्त निर्णय घेणारउपायुक्त अय्युब खान यांनी नमूद केले की, कर अदालतीच्या तारखा लवकरच निश्चित होणार आहेत. कर अदालतमध्ये नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढील कारवाई अवलंबून आहे. यासंदर्भात मनपातील पदाधिकारी, आयुक्त घरगुती मालमत्ताधारकांवर कारवाईसंदर्भात अंतिम निर्णय घेतील.थकबाकीची मागणीच कधी केली नाही....महापालिका दरवर्षी चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरा म्हणून डिमांड नोटीस नागरिकांना पाठविते. ज्या नागरिकांनी चालू वर्षात कर भरला नाही, त्यांच्या अकाऊंटवर ही थकबाकी लावण्यात येते. मागील काही वर्षांपासून थकबाकीवर चक्क २४ टक्के व्याज लावण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. मूळ थकबाकीपेक्षा व्याज अधिक झाले आहे. व्याजासह ही रक्कम वसूल करण्यासाठी मनपा प्रशासन कायद्याचा आधार घेत आहे. मनपा पदाधिकाऱ्यांनी लवकरच घरगुती मालमत्ताधारकांकडून सक्तीने कर वसूल करा असे आदेश दिल्यास कोट्यवधी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा होतील. शहरातील विकास कामांसाठी शासनाकडे निधी मागण्याची गरज मनपाला पडणार नाही. २९० कोटींच्या थकबाकीत १५० कोटी रुपयेही वसूल झाल्यास शहरातील अनेक रस्ते गुळगुळीत होतील.