शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

मनपा शिक्षिकेची आत्महत्या

By admin | Updated: July 4, 2014 01:09 IST

औरंगाबाद : हर्सूल महापालिका शाळेतील अविवाहित शिक्षिकेने हर्सूल तलावात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी घडली.

औरंगाबाद : हर्सूल महापालिका शाळेतील अविवाहित शिक्षिकेने हर्सूल तलावात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी घडली. दिवसभर शोधकार्य केल्यानंतरही अग्निशामक दल, पोलीस व नातेवाईकांना सदरील शिक्षिका सापडली नव्हती. दुसरीकडे अंधार पडला तरी नातेवाईकांनी शोधमोहीम सुरूच ठेवली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिक्षिकेचा मृतदहे हर्सूल तलावाच्या पाण्यावर तरंगताना नातेवाईकांच्या नजरेस पडला. त्यांनी बेगमपुरा पोलिसांना त्याबाबत कळविले असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शिक्षिकेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केला. पल्लवी दादाराव खंडागळे (२६, रा. पिसादेवी परिसर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वीच ती या शाळेवर रुजू झाली होती. हर्सुल तलावाच्या पायथ्याजवळ उभी असलेली तिची तिची स्कूटी (क्र. एमएच-२० डीबी- ५२२१), पर्स व सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. पल्लवी खंडागळे ही शिक्षिका गुरुवारी सकाळी ६.३० वाजता शाळेत जाते असे सांगून घरातून स्कूटी घेऊन निघाली. मात्र, ती शाळेत न जाता हर्सूल तलाव परिसरात गेली. तेथे तिने हर्सूल तलावाच्या गेटसमोरील उद्यानाजवळ आपली स्कूटी उभी केली. तिने मोबाईलवरून खिल्लारे या नातेवाईकास फोन केला व मी हर्सूल तलावात आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. खिल्लारे यांनी तिची बरीच समजूत काढली; पण तिने अचानक मोबाईल स्वीचआॅफ केला. तो मोबाईल तिने पर्समध्ये ठेवून पर्स स्कूटीच्या हँडलला अडकवली. हँडललॉक केल्यानंतर तिने ती किल्लीही पर्समध्ये ठेवून दिली. दरम्यान, खिल्लारे यांनी ही घटना तिच्या आईला कळविली. याशिवाय दीड तास झाला तरी पल्लवी खंडागळे अजून शाळेत का आली नाही, म्हणून एका शिक्षिकेनेही तिच्या आईकडे मोबाईलवरून विचारणा केली. त्यानुसार तिची आई व नातेवाईकांनी हर्सूल तलाव गाठून पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत कळविले. पोलीस नियंत्रण कक्षाने तात्काळ सिडको अग्निशामक दलास तलावाकडे पाचारण केले. आईसोबत झाले होते भांडणपल्लवी खंडागळे या शिक्षिकेचे आईसोबत भांडण झाले होते. रागाच्या भरात तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तलावाच्या पायथ्याला उद्यानाजवळ त्या शिक्षिकेची हँडल लॉक केलेली स्कूटी, स्कूटीच्या हँडलला अडकवलेली पर्स, पर्समध्ये बंद केलेला मोबाईल व सुसाईड नोट सापडली. त्यात ‘मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे, कोणालाही दोषी धरू नये’ असा लिहिलेला मजकूर आहे. दिवसभर शोधकार्यअग्निशमन जवान व बेगमपुरा पोलिसांनी हर्सूल तलाव परिसरात दिवसभर शिक्षिकेचा शोध घेतला. सकाळी तलावाच्या कठड्यावर दोन सुरक्षा जवान गस्त घालत होते. त्यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता ‘सकाळी ६ वाजेपासून आम्ही येथे गस्त घालत आहोत. इकडे कोणीही आलेले नाही’, असे सुरक्षा जवानांनी सांगितले.