शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मनपा करणार २०० कोटींची वसुली!

By admin | Updated: April 9, 2016 00:53 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद महापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे.

मुजीब देवणीकर, औरंगाबादमहापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर पालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. मागील १० ते १५ वर्षांमध्ये ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलीच नाही, त्यांच्याकडून आता थकबाकी वसूल करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून, २०० कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.मागील तीन दशकांमध्ये मालमत्ता कर वसुलीकडे मनपाने कधीच लक्ष दिले नाही. जकात आणि त्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांवर मनपाचा कारभार चालत होता. शासनाने एलबीटी कर वसुली बंद केल्यापासून मालमत्ता कर हा सर्वात मोठा आर्थिक स्रोत मानण्यात येत आहे. दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत मनपाला मालमत्ता कर वसूल करण्याची आठवण येते. प्रत्येक मालमत्ताधारकाला चालू आर्थिक वर्षाची ‘डिमांड’ पाठविण्यात येते. प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक आढेवेढे न घेता कर भरून टाकतात. अनेक मालमत्ताधारक डिमांड नोटीसकडे दुर्लक्ष करतात. मालमत्ताधारकाने थकविलेल्या या रकमेची नोंद मनपा दप्तरी होते. मात्र, थकबाकीची वसुली कधीच होत नाही. थकबाकीचा हा डोंगर वर्षानुवर्षे वाढतच जातो. मागील १५ वर्षांमध्ये मालमत्ताधारकांनी किमान २०० कोटी रुपये थकविल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने बांधला आहे.प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील १०० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही यादी तयार झाल्यावर लगेचच सक्तीने वसुली करण्यात येईल. मालमत्ता सीलही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी वसुलीसाठी मायक्रोप्लॅनही तयार केला आहे. मनपाचा आर्थिक कणा मजबूत झाल्यास विकास कामे करता येतील, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. या दृष्टीने प्रशासन वाटचाल करीत आहे. मालमत्ता करासंदर्भात ठोस पाऊलही उचलण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.