शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

निर्धार मेळाव्यापूर्वीच खिंडार !

By admin | Updated: January 30, 2016 00:39 IST

बीड : सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष ठकसेन तुपे यांनी संस्थापक कल्याण आखाडे यांच्या कारभारावर टीका करत शनिवारी राजीनामा दिला.

बीड : सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष ठकसेन तुपे यांनी संस्थापक कल्याण आखाडे यांच्या कारभारावर टीका करत शनिवारी राजीनामा दिला. ३१ जानेवारी रोजी पुण्यात संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज निर्धार मेळावा होत आहे. त्याआधीच बंडाचे निशाण फडकल्याने संघटनात्मक ‘आखाडा’ चांगलात ‘ताप’ल्याचे चित्र आहे.संत सावता महाराज यांच्या नावाने ९ वर्षांपूर्वी येथे सावता परिषदेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. माळी समाजाच्या ‘कल्याणा’चे भांडवल करत संघटनेने राज्यभर कार्यकक्षा रुंदावल्या. मात्र, चार वर्र्षांंपूर्वी संस्थापक आखाडे यांनी भाजपशी जवळीक वाढवली. एवढेच नाही तर संघटनेचा भाजपला जाहीर पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी या भूमिकेवर आक्षेप नोंदविला व संघटनेला सोडचिठ्ठी देत माळी महासंघात प्रवेश केला. दरम्यान, आता पुन्हा एकदा संघटनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. कार्याध्यक्ष ठकसेन तुपे यांनी ‘संघटनेत सामान्य कार्यकर्त्यांना वाव नाही, स्वाभिमान गहाण ठेवून काम करावे लागते, समाजाचा विश्वासघात होत आहे’ असे आरोप करुन सावता परिषदेला रामराम ठोकत असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. ३१ जानेवारी रोजी पुण्यात दोन मंत्री, अर्धा डझन आमदारांच्या उपस्थितीत संघटेचे अधिवेशन व माळी समाजाचा निर्धार मेळावा होत आहे. त्याचे बॅनर, पोस्टर शहरभर झळकत आहेत. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत कार्याध्यक्षच संघटनेतून बाहेर पडल्याने आखाडेंविरुद्ध असलेली नाराजी उघड झाली आहे.आणखी काही पदाधिकारी नाराज असून, बंडाच्या पावित्र्यात असल्याचा दावा तुपे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)