शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त

By admin | Updated: December 28, 2016 00:06 IST

जालना : मंगळवारी केलेल्या कारवाईत ९ धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली.

जालना : शहरात असलेली १७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार नगर पालिकेने मंगळवारी पोलिस बंदोबस्तात ही धार्मिकस्थळे विधीवत पूजा करून हटविली. मंगळवारी केलेल्या कारवाईत ९ धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे वाद वगळता सर्व मोहीम शांततेत झाली. दरम्यान, ४ ठिकाणी नागरिकांनी स्वत:हून मूर्ती तसेच बांधकाम काढून घेतले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता या मोहिमेला सुरूवात झाली. मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्यासह पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह दीडशे कर्मचारी तसेच तेवढ्याच संख्येने पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमणावर जेसीबी चालवण्यात आली. अंबड चौफुली परिसरातील म्हाडा कॉलनी, गांधी चमन, दर्गा रोड भाग, मुरारी नगर, मोदीखाना, गायत्रीनगर, जिजामाता कॉलनी आदी भागांतील धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. एकूणच नगर पालिकेने केलेल्या कारवाईला कोठारी नगरातील रहिवाशांनी विरोध दर्शविला होता. त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांचा विरोध मावळला. (प्रतिनिधी)