शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये होणार ३५० खाटांचे नवीन शासकीय रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:34 IST

बीड जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या मंजूर २०० खाटांच्या विस्तारित जागेचा प्रश्न पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या मंजूर २०० खाटांच्या विस्तारित जागेचा प्रश्न पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाकडून जागेचा आगाऊ ताबा रुग्णालयास देण्याचे आदेश गुरुवारी आयोजित बैठकीत दिले. दरम्यान, या २०० खाटांसह रुग्णालयाची ३५० खाटांची नवीन सुसज्ज इमारत होणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देऊन कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बीड नगरपालिका व जिल्ह्यातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस आ.जयदत्त क्षीरसागर, आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, नगर विकास विभागाचे सचिव नितीन करीर, सी.पी.जोशी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदी उपस्थिती होते.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विस्तारित जागेच्या प्रश्नांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री पंकजा मुंडे व खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी हा प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या जागेचा आगाऊ ताबा देण्याचे निर्देश दिले. या २०० खाटांसह मातृत्व बाल आरोग्यासाठी १०० आणि आयुष रुग्णालयाकरिता ५० अशी एकूण ३५० खाटांची नवीन इमारत लवकरच उभी राहणार आहे.