शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्पर्धेतून मिळाली नवी उर्जा

By admin | Updated: January 13, 2017 00:39 IST

उस्मानाबाद : खो-खो,कबड्डीसह व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात जिल्ह्याचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर दबदबा आहे.

उस्मानाबाद : खो-खो,कबड्डीसह व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात जिल्ह्याचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर दबदबा आहे. मात्र त्यानंतरही आजवर राष्ट्रीय स्तरावरच्या एकाही स्पर्धेच्या आयोजनाची संधी उस्मानाबादला मिळालेली नव्हती. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांच्या पुढाकाराने ही जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना ही अनोखी मेजवाणी मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी उर्जा मिळाली आहे.उस्मानाबाद जिल्ह्याचा विविध क्रीडा प्रकारात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कायम दबदबा राहिलेला आहे. येथील व्हॉलीबॉल आणि कबड्डीची मैदाने सरावाच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत गाजत असायची. अशीच स्थिती खो-खो या क्रीडा प्रकाराचीही. म्हणूनच जिल्ह्यातील खो-खो खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेहमीच विजयाचा झेंडा फडकविला आहे. खो-खो क्रीडा प्रकारात क्रीडा संघटक म्हणून शाहुराज खोगरे यांनी पुरस्कार पटकाविला आहे. तर डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिला क्रीडा मार्गदर्शनासाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. ही परंपरा पुढे कायम राहिली. सुजाता शानमे, रोहिणी आवारे आणि सुप्रिया गाढवे या तिघींनीही शिवछत्रपती पुरस्कारावर जिल्ह्याची मोहर उमटविली. उस्मानाबादच्याच सारिका काळे आणि सुप्रिया गाढवे या दोेघींनी भारताच्या खो-खो संघाचे तर जिल्ह्यातील १७ खेळाडूंनी राज्याचे नेतृत्व करण्याची कामगिरीही केली आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जिल्ह्यातील अश्विनी खटके, संगीता चव्हाण, मनिषा इंगळे, निकिता पवार, सुप्रिया गाढवे, सारिका काळे आणि राहुल घुटे यांनी बहुमान मिळविलेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात खो-खो ची शंभरपेक्षा अधिक मैदाने असून, यातील भोसले हायस्कूल, शरद पवार हायस्कूल, जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था ही उस्मानाबादमधील तीन मैदाने तसेच तालुक्यातील चिखली येथील गांधी विद्यालयाचे मैदान अशी चार मैदाने राष्ट्रीय दर्जाची असून, येथून सातत्याने दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याचे काम सुरु आहे. अशातच शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांच्या पुढाकाराने आणि राज्य खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्यासह सहकार्याने उस्मानाबादेत २७ वी फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा घेण्यात आली. अत्यंत देखणे नियोजन असलेल्या या स्पर्धेत देशातील १६ दिग्गज संघांनी सहभाग घेतला. या माध्यमातून जिल्ह्यातील क्रीडापे्रमींना राष्ट्रीय स्तरावरचे खेळ ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची अनोखी संधी मिळाली. क्रीडाप्रेमी असलेल्या उस्मानाबादकरांनीही या संधीचे अक्षरश: सोने करीत, स्टेडीयमवर हजारोंची उपस्थिती लावली. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रालाही नव्याने उर्जितावस्था प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.