शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत पडेल नवीन आठ गटांची भर

By admin | Updated: June 22, 2016 00:56 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा तर दोन ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यामुळे आगामी जिल्हा परिषद

औरंगाबाद : जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा तर दोन ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला गटांची पुनर्रचना करावी लागणार आहे. सध्या जिल्हा परिषदेतून चार गट कमी झाले असले तरी मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये नव्याने किमान ८ गटांची भर पडेल, अशी शक्यता सदस्यांनी व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी सोयगाव आणि फुलंब्री या दोन ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा मिळाला. दुसरीकडे, चार-पाच महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरालगत सातारा आणि देवळाई या दोन ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला गटांची पुनर्रचना करावीच लागेल. मागील निवडणुकीत सदस्यांचे आरक्षण आॅगस्टमध्ये जाहीर झाले होते. त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी गटांचे आरक्षणही आॅगस्टमध्ये जाहीर होऊ शकते. सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६० आहे. अलीकडेच जिल्ह्यातील फुलंब्री आणि सोयगाव या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला तर सातारा आणि देवळाई हे दोन गट महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे आगामी जि.प. निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे हे चार गट वगळले जातील. दुसरीकडे, सन २0११च्या जनगणनेनुसार जि.प. गटांसाठी आरक्षणाची सोडत निघाल्यास बाशिंग बांधून बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे राजकारण धोक्यात येऊ शकते. निवडणूक आयोगाला फुलंब्री, सोयगाव, देवळाई आणि सातारा या चार गटांची लोकसंख्या जिल्हा परिषद मतदारसंघातून वगळावी लागणार आहे. दुसरीकडे बऱ्याच गटांमध्ये लोकसंख्याही वाढलेली आहे. त्यामुळे मतदारसंघाची पुनर्रचना केल्यास नव्याने किमान ८ गट अस्तित्वात येतील. परिणामी, निवडणुकीनंतर ६४ सदस्य जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होतील, असा कयासही सदस्यांनी बांधला आहेत, असे असले तरी जिल्हा निवडणूक विभागाने मात्र, यावर तूर्त बोलण्यास नकार दिला. निवडणूक आयोगाकडून अद्याप तरी गटांच्या पुनर्रचनेबद्दल कसल्याही सूचना नसल्याचे अधिकारी म्हणतात.नुकतेच सोडत पद्धतीने जि.प. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. आगामी निवडणुकीनंतर औरंगाबाद जि.प.चे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी (मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत अडीच वर्षांसाठी) राखीव असेल. मार्च २०१२ मध्ये अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. अडीच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठीच राखीव झाले. त्यामुळे आरक्षण जाहीर करताना रोटेशन पाळले नसल्याची प्रतिक्रिया विद्यमान काही सदस्यांनी व्यक्त केली.