शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नवे २५ फौजदार, २५० जवान रुजू

By admin | Updated: June 16, 2016 00:16 IST

औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत.

औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आलेले २५ परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. नव्याने दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आयुक्तालयाचे मनुष्यबळ ३ हजार ५१७ झाले आहे.देशातील प्रमुख पर्यटन केंद्रापैकी एक असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. विविध औद्योगिक वसाहतींसोबतच दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची यात भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत तीन पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३५ पोलीस निरीक्षक आणि ५५ पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विशेष शाखा कार्यरत आहे. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्रंदिवस चार्ली पोलीस दुचाकीवर शहराच्या वेगवेगळ्या भागांत गस्तीवर असतात. त्यासोबतच पोलीस कं ट्रोल रूम मोबाईल या वातानुकू लित वाहनामधून गस्त सुरू करण्यात आली. या गस्तीमुळे शहरातील रस्त्यावरील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे कमी झाले आहेत. पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध ठाण्यांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळे दरवर्षी भरतीचे आयोजन करण्यात येते. २०१४ साली भरती झालेले २५० पोलीस शिपाई नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून रुजू झाले. पोलीस आयुक्तालयात २५ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रुजू झाले आहेत. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना राज्यातील विविध विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत. १२ फौजदारांची पदावनतीपोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या १२ फौजदारांना १४ जून रोजी तडकाफडकी पदावनत करून सहायक फौजदार या मूळ पदावर त्यांना पदस्थापना देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या पदावनतीने फौजदारांमध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत मंजूर एकूण पदांपैकी निम्मी पदे ही सरळसेवा भरती प्र्रक्रियेंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतात. तर उर्वरित खात्यांतर्गत बढती देऊन भरली जातात. रिक्त असलेल्या एकूण ४२ पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार सहायक पोलीस उपनिरीक्षकांना तात्पुरत्या बढत्या देण्यात आल्या होत्या. २५ ताज्या दमाचे फौजदार आयुक्तालयात रुजू झाले. या फौजदारांना विविध ठिकाणी नेमणुका देण्यात येत आहेत. त्यांना नेमणुका देण्यासाठी पदे रिक्त करणे आवश्यक होते. म्हणून या पदावनती झाल्या.