शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

आजादी की कभी शाम ना होने देंगे...

By admin | Updated: August 15, 2014 01:11 IST

आडगावच्या सैनिकांना सलाम

मुबीन पटेल, पिशोरपूर्वी सैन्यदलात भरती होण्यासाठी तरुण सहजासहजी पुढे येत नसत, म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा...’ अशी हाक घालावी लागली होती; परंतु गावातील वडीलधाऱ्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू केलेल्या देशसेवेच्या चळवळीला तरुणाईने साद दिली आणि सैनिकांचे गाव म्हणून गावाची ख्याती झाली व आडगाव पिशोरने रचली यशोगाथा...औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वसलेले आणि अवघी तीन हजार लोकसंख्या असलेले आडगाव (पिशोर). या गावाला ७७ वर्षांची सैन्यपरंपरा लाभली असून, अजूनही अनेक तरुण सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करीत आहेत. १९३७ साली ग्वाल्हेर पायदलात (इन्फंट्री) गावातील फकीरराव हैबतराव भोसले दाखल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परिस्थिती जवळून पाहिलेल्या फकीररावांनी तरुणांना सैन्यदलात येण्यासाठी प्रवृत्त केले. निवृत्त झाल्यानंतरही पोलीस दलात उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर त्यांनी काम केले. ‘गार्ड आॅफ आॅनर’चा सन्मान त्यांना मिळाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत भोसलेंचा सुरक्षेसाठी राहावे लागत असे. देशसेवा करणारा पती मिळावा, अशीच इच्छा गावातील तरुणींना आहे. सैनिक जीवनसाथी मिळवून ५0 मुलींनी देशसेवा करणाऱ्या जवानांचा संसार फुलवला आहे. पूर्वजांपासून मिळालेले देशसेवेचे धडे आम्ही मनात साठवलेले असून, मोठा भाऊ व मी स्वत: सैन्यात असून, भावी पिढीला धडे देण्याचा मानस तरुण सैनिक स्वप्नील भोसले याने बोलून दाखवला.सुटीसाठी घरी आलेले व सध्या लडाख येथे सेवा बजावणारे लान्स हवालदार अयूब मदार राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये १९ वर्षांपासून कार्यरत आहेत. लोकमतशी बोलताना त्यांनी अनुभव कथन केले. बारामुल्ला येथे असताना जवळच असलेल्या वानेगाव येथे हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेच्या अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीबद्दल त्यांनी सांगितले तेव्हा अंगावर शहारे आले. या बटालियनने १५८ अतिरेक्यांना कंठस्नान घातले असून, २९ जिवंत, तर २५ अतिरेक्यांना आत्मसमर्पण करावयास भाग पाडले आहे. गावातील कुठल्याही सैनिकाला अपयश आलेले नसल्याने सैन्याकडे तरुणांचा कल वाढलेला आहे. शारीरिक क्षमतेअभावी तरुणांना कधी कधी भरती होण्यास त्रास घ्यावा लागतो. शासनाने व्यायामशाळा उपलब्ध करून दिल्यास सोय होईल, असे पं.स. सदस्य परशराम बोलकर यांनी सांगितले.पिशोर येथे शिक्षिका असलेल्या रेखा प्रकाश भोसले या आडगाव जि.प. शाळेत येथील सून असून, त्यांचे पती प्रकाश भोसले व दीर अनिल भोसले दोघे सैन्यदलात आहेत. नणंद सरिता याही सैनिक पतीसोबत सुखाने संसार करीत आहेत. दोघांकडूनही देशाच्या रक्षणाचे काम होत आहे आणि माझ्याकडून देश घडविण्याचे. तिघांचेही जीवन देशासाठी कामी येत असल्याचा व आडगावची सून असल्याचा अभिमान असल्याचे रेखा भोसले यांनी सांगितले.ही ७७ वर्षांची परंपरा कधीही खंडित होऊ देणार नाही. देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असल्याचे प्रतिपादन गावातील तरुणांनी व्यक्त केले. आडगावचे ४५ तरुण पोलीस खात्यात, देशसेवेची परंपरा कायम७७ वर्षांपासून सुरू झालेली ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची जबाबदारी आडगावच्या तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.आडगाव (पिशोर) येथून १४0 जवान देशाची सेवा करीत आहेत. राज्यातील कोणत्याही गावापेक्षा ही संख्या अधिक असल्याचा विश्वास ग्रामस्थांना आहे. सैन्याबरोबर ४५ तरुण पोलीस खात्यात, तर ज्ञानार्जन करून समाजसेवा करणारे ७0 शिक्षकही आडगाव (पि.) येथे आहेत.