माजलगाव : तालुक्यातील मंजरथ येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १० ट्रक तहसीलदार अरूण जऱ्हाट यांच्या पथकाने गुरूवारी रात्री आठ वाजता पकडल्या. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरू असून, याकडे महसूल पथकाने संभाजी चौक, परभणी टी पॉर्इंट येथे सापळे लावून वाळू वाहून नेणाऱ्या दहा ट्रक जप्त केल्या. ट्रक क्र. एमएच १२ एफसी ७८९१, एमएच०४/६३७५, एमएच १२ एफसी २१९९, एमएच १२ डीजी १२६६, एमएच १४ सीपी ९१४२, एमएच २३/६४८६, एमएच ०४ सीपी ७८३५, एमएच २४ एव्ही ५००६, एमएच २३ डब्ल्यू ४३५५, एमएच ४४/८८०१, एमएच ०४ बीजे ७९० चा समावेश आहे.सर्व ट्रक तहसील कार्यालयात लावल्या आहेत. शेख जहीर शेख बाबाजी, शेख मुनीरखाँ, शेख शाजेद शेख मजीद, शेख अन्वर शेख हुसेन, शेख युसूफ, शेख अजीम, अंकुश मेंडके, शेख उपरेश कुरेशी (सर्व रा.बीड), अर्जून गायकवाड (रा. धारूर), बाबासाहेब मस्के (रा. पालवण, ता. बीड) या ट्रकचालकांचा समावेश आहे.दरम्यान, कारवाईनंतर तहसीलदार जऱ्हाट यांचा भ्रमणध्वनी बंद होता. तहसील कार्यालयातही ते नव्हते. त्यामुळे पकडलेल्या ट्रकचालकांविरूद्ध नेमकी काय कारवाई करणार ? हे स्पष्ट नाही. (वार्ताहर)
मंजरथजवळ वाळूचे १० ट्रक पकडले
By admin | Updated: April 3, 2015 00:43 IST