शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:18 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत आघाडी करायची का स्वतंत्रपणे निवडणूक लढायची, याबाबतचा निर्णय जि़प़ उपाध्यक्ष तथा गटनेते समाधान जाधव यांच्यावर सोपविण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत आघाडी करायची का स्वतंत्रपणे निवडणूक लढायची, याबाबतचा निर्णय जि़प़ उपाध्यक्ष तथा गटनेते समाधान जाधव यांच्यावर सोपविण्यात आला आहे़जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असून अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहेत़ त्यामुळे जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार की निवडणूक लढविणार, असा प्रश्न निर्माण झाला़ यासंदर्भात राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी या निवडणुकीत निर्णय घेण्याची जबाबदारी जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर सोपवली आहे़ या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील सर्व गट - तट एकत्र झाले असून जिल्हाध्यक्ष गोरठेकर, आ़ प्रदीप नाईक, माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांच्या सूचनेनुसार ७ सप्टेंबर रोजी गटनेता समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या १० सदस्यांची बैठक घेण्यात आली़ यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने व्यूहरचना आखली़ काँग्रेससोबत सन्मानाने आघाडी झाली तर ठीक नाही तर निवडणूक लढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ यासंदर्भात गटनेता समाधान जाधव यांनी निर्णय घ्यावा, असा निर्णय सदस्यांनी घेतला़आघाडी संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे निमंत्रण आले असून राष्ट्रवादीचे गटनेता समाधान जाधव यांच्यासोबत बोलणी करण्यात येणार आहे़ यावेळी बिनविरोध सदस्य निवडून देण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे़ अन्यथा राष्ट्रवादीकडून एकला चलो रे चा अवलंब केला जाणार आहे़ दरम्यान, गुरूवारी राष्ट्रवादीच्या १० सदस्यांनी उमेदवारी अर्ज घेतले़ बैठकीस सभापती दत्तात्रय रेड्डी, मधुमती कुंटूरकर, अ‍ॅड़ विजय धोंडगे, मधुकर राठोड, सुनयना जाधव, संगीता मेकलवार, सुनंदा दहिफळे, संगीता जाधव, ललिता यलमगोंडे यांची उपस्थिती होती़