शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’कडून १०२ शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजारांची मदत

By admin | Updated: May 31, 2016 00:09 IST

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल वेल्फेअर विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांंना रोख मदत देण्यात आली.

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल वेल्फेअर विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांंना रोख मदत देण्यात आली. लातूर जिल्ह्यातील १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना खरीप पेरणीसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप सोमवारी करण्यात आले. मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात धनादेशाचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मंचावर माजी खा.डॉ.जनार्दन वाघमारे, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डी.एन. शेळके, बस्वराज पाटील नागराळकर, प्रा.एन.बी. शेख, अशोक गोविंदपूरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, रेखा कदम, आशा भिसे, युवक अध्यक्ष चंदन पाटील, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, केंद्रात व राज्यात आलेले भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही. देशाचे पंतप्रधान साडेसातशे दिवसांपैकी चारशे दिवस विदेश दौऱ्यावरच आहेत. महाराष्ट्र शासनाकडूनही दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक विभाग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन आला आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उद्याच्या पेरणीसाठी प्रत्येकी १५ हजारांची मदत दिली आहे. (प्रतिनिधी)