शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

चार जागाही राष्ट्रवादी काँग्रेसने पटकाविल्या

By admin | Updated: October 29, 2015 00:20 IST

कळंब : नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी न्यायालयातील याचिका काढून घेतल्यानंतर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी करण्यात आली.

कळंब : नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी न्यायालयातील याचिका काढून घेतल्यानंतर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या मताधिक्यांनी चारही जागांवर विजय मिळविला. त्यामुळे १८ सदस्यीय बाजार समितीत राकाँचे संख्याबळ १५ झाले आहे.कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या ३३ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी बाजार समिती निवडणुकीत मताधिकार मिळावा यासाठी चार स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. यावर मतदार यादीतील अंतिम करण्यात आलेल्या सदस्यांसह न्यायालयात गेलेल्या २९७ नवीन सदस्यांचे मतदान घेऊन या मतपत्रिका दोन स्वतंत्र मतपेटीत सीलबंद करण्यात आल्या होत्या. परंतु, १३ आॅक्टोबर रोजी मतमोजणीपर्यंत न्यायालयाचेअंतरिम निर्देश न आल्याने या चार जागांची मतमोजणी राखीव ठेण्यात आली होती. अखेर संबंधित याचिकाकर्त्यांनीच याचिका काढून घेतल्यामुळे २१ आॅक्टोबर रोजी न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याची मुभा दिली होती. यामुळे बुधवारी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक सी. पी. बनसोडे, सहकारी अधिकारी ए. आर. सय्यद आदींच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सुरूवातीला झालेल्या मतमोजणीवेळी १४ पैकी ११ जागा जिंकून राकाँने बाजार समितीवर एकहाती वर्चस्व मिळविले होते. तरीही राकाँतील ‘तरूण तुर्क’ समजली जाणारी मंडळी मैदानात उतरविल्याने ग्रामपंचायत मतदार संघातील मतमोजणीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर चारही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली आहे. सर्वसाधारणमधून माजी युवक तालुकाध्यक्ष धनंजय वाघमारे, विद्यमान संचालक प्रणव चव्हाण, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून युवक तालुकाध्यक्ष अरूण चौधरी तर अ. जा. मतदारसंघातून भगवान ओव्हाळ हे उमेदवार विजयी झाले.