शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

आजपासून रंगणार राष्ट्रीय योगा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:03 IST

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्या, मंगळवारपासून राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्त खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी अशा ...

ठळक मुद्देमहाराष्ट्राचा संघ जाहीर : यजमान भरीव कामगिरी करण्यास असणार सज्ज

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्या, मंगळवारपासून राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्त खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी अशा एकूण एक हजार जणांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा योगा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे. २ फेब्रुवारीपर्यंत रंगणारी ही स्पर्धा क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉलमध्ये विद्युत प्रकाशझोतात होणार आहे. १४ व १७ वर्षांखालील मुले, मुलींची ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेत अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू आपला कसब पणाला लावणार आहेत. या स्पर्धेमुळे योगा खेळाचे चांगले वातावरण निर्माण होणार असून, त्याचा प्रसार व प्रचार होण्यास मदत होईल. जनतेने या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे सांगतानाच भविष्यात औरंगाबादेत फेडरेशनची राष्ट्रीय योगा स्पर्धा आयोजित करण्याचा मानसही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून आलेल्या राम अवतार यांनीही ही स्पर्धा अत्युच्च दर्जाची होईल, असा विश्वास व्यक्त केला, तसेच ही स्पर्धा इतरांसाठी एक आदर्श व अद्भूत ठरेल, असेही त्यांनी सांगितले. स्पर्धेचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल येथे २९ जानेवारी रोजी सकाळी १0.३0 वाजता राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, जिल्हा योगा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा योगा संघटनेचे सुरेश मिरकर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी दिली. या पत्रकार परिषदेला क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राजाराम दिंडे, गोकुळ तांदळे, गणेश बेटुदे, जिल्हा संघटनेचे सचिव सुरेश मिरकर आदी उपस्थित होते.महाराष्ट्राचा संघ१४ वर्षांखालील मुले : ओम राजभार, ओम कोल्हे, रूपेश संघे, यश पानीभाटे, प्रणय कांगले, कौशिक चाकोटे, ओमकार साकत. क्रीडा मार्गदर्शक : जतीन सोळंकी.१४ वर्षांखालील मुलींचा संघ : रिद्धी बाचीम, आर्या तांबे, सुहानी गिरीपुंजे, मृणाल खोत, मृणाली बनैत, स्वानंदी वालझडे, क्रीडा मार्गदर्शक : श्वेता पेडणेकर.१७ वर्षांखालील संघ (मुले) : आयुष गोरे, मानन कासलीवाल, सुमित पोटे, केदार दिवटे, अभिजित सावंत, दूर्वांकुर चाळके, सुमित पोटे. क्रीडा मार्गदर्शक : रविभूषण कुमठेकर.१७ वर्षांखालील मुलींचा संघ : प्राप्ती किनारे, तनुश्री पालांदूरकर, साक्षी काटे, गौरी दाकवे, तन्वी कुंभार, सानिका जाधव. क्रीडा मार्गदर्शक : अनिता पाटील. संघ व्यवस्थापक : गोकुळ तांदळे, लता लोंढे.