शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

नाफेडची हरभरा खरेदी दोन दिवसानंतर होणार बंद

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

हिंगोली : बाजारात हरभर्‍याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे उत्पादकांना नाफेडच्या रूपातून पर्याय मिळाला होता; परंतु न भिजलेल्या दर्जेदार मालाच्या अटीमुळे नाफेडकडून उत्पादकांची साफ निराशा झाली.

हिंगोली : बाजारात हरभर्‍याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे उत्पादकांना नाफेडच्या रूपातून पर्याय मिळाला होता; परंतु न भिजलेल्या दर्जेदार मालाच्या अटीमुळे नाफेडकडून उत्पादकांची साफ निराशा झाली. उत्कृष्ट मालासाठी असलेल्या या नाफेडचे खरेदी केंद्र दोन दिवसानंतर बंद होणार आहे. मागील दोन महिन्यात तीन तालुक्यात मिळून केवळ ३ हजार ४०६ क्विंटल हरभर्‍याची खरेदी झाली आहे. रबी हंगामात हरभरा जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाते. सोयाबीनवर हरभरा घेण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे क्षेत्र ६९ हजार हेक्टर होते. सोयाबीनच्या आगमनापासून हरभर्‍याचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. पाण्यावर हरभरा घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही अधिक आहे; परंतु यंदा अवकाळी पावसाने पिके साफ झाल्याने हरभर्‍याचे उत्पादन घटले. एकीकडे अस्मानी संकट ओढवले असताना दुसरीकडे सुलतानी संकटाने शेतकर्‍यांना घेरले. बाजारात हरभर्‍यास कोणीही विचारीनासे झाले. अगदी कवडीमोल भावात खासगी व्यापार्‍यांकडून हरभरा खरेदी होवू लागला. शासनाने ३ हजार १०० रूपयांचा हमीभाव जाहीर केला असताना अडीच हजारांच्या घरात हरभरा विक्री होवू लागला. कमी दरांमुळे उत्पादन खर्चही निघेनासा झाला. अशात उत्पादकांना नाफेडच्या रूपातून पर्याय मिळाला होता; परंतु नाफेडच्या जाचक अटीमुळे उत्पादकांची निराशा झाली. अधीच अवकळी पावसात हरभरा भिजल्यामुळे मालास बाधा पोहचली. परिणामी जिल्ह्यातील हरभरा नाफेडच्या अटी व नियमांत बसला नाही. त्याचा फटका हरभरा उत्पादकांना सोसावा लागला. प्रतिक्विंटलास ३ हजार १०० रूपयांचा मिळत असलेला दर बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकर्‍यांच्या पदरी पडला. कारण मागील दोन महिन्यांपासून होत असलेल्या खरेदीत अत्यंत कमी शेतकर्‍यांनी माल नाफेडला दिला. आवक कमी असल्यामुळे हिंगोली, सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यात मिळून ३ हजार ४०६ क्विंटलची खरेदी झाली. त्यातही कळमनुरी आणि सेनगाव तालुक्याला तर तीन अंकी आकडा गाठता आलेला नाही. दोन्ही तालुक्यात अनुक्रमे ८२० आणि ७२१ क्विंटलची खरेदी झाली. दुसरीकडे हिंगोली बाजार समितीत २ हजार ७०० रूपयांच्या पुढे भाव सरकला नाही. किमान दर तर सव्वादोन हजारांच्या घरात होता. बाजार समितीच्या तुलनेत ४०० रूपयांनी अधिक भाव असतानाही सातबारा असणार्‍या शेतकर्‍यांकडून माल विक्रीसाठी आणला गेला. (प्रतिनिधी) जाचक अटींमुळे शेतकरी अडचणीत ‘अधीच उल्हास अन् त्यात फाल्गून मास’ या म्हणीसारखी अवस्था नाफेडची झाली आहे. शेतकर्‍यांच्या दबावामुळे सुरू केलेली खरेदी नावालाच राहिली. जाचक अटींमुळे हरभर्‍याची खरेदी अधिक प्रमाणात झाली नाही. तसेच हिंगोली, सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यात दिवसाआड खरेदी होत असल्यामुळे उत्पादकांना खरेदीचे दिवस कळत नाहीत. त्यातच या तिन्ही तालुक्यासाठी एकच कर्मचारी देण्यात आला आहे. शिवाय सुरूवातीला मालाचा नमूना पाहिल्यानंतरच कर्मचार्‍याने परवानगी दिल्यानंतर माल विक्रीसाठी आणता येतो. अन्यथा मालास थोडीशी बाधा असेल तर खरेदीअभावी उत्पादकांची बेजारी वाढते. त्यामुळे खरेदी करायचेच असले तर एवढ्या जाचक अटी टाकण्याची गरज काय? असा सवाल उत्पादकांकडूनन विचारला जात आहे. तालुकानिहाय हरभर्‍याची पेरणी हेक्टरमध्ये, नाफेडची खरेदी तालुका सर्वसाधारण पेरणी क्षेत्र टक्केवारी क्विंटलात हिंगोली ५८३० १८४७९ ३३६.९६ १८६५ कळमनुरी १२४०० १९९९२ १६०.६६ ७२१ वसमत ९३६० १३१९० १४०.९२ ८२१ औंढा २९६० ८४२० २८४.४६ - सेनगाव ४८१० ९६५० २००.६२ - एकूण ३५३६० ६९७३१ १९७.१० ३४०६