शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नंदलाल भोमा यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST

भोमा हे नंदू घीवाले म्हणून शहरात प्रसिद्ध होते. महावीर भवनसमोरील त्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांशी व्यवहार करीत असताना त्यांना सकाळी ...

भोमा हे नंदू घीवाले म्हणून शहरात प्रसिद्ध होते. महावीर भवनसमोरील त्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहकांशी व्यवहार करीत असताना त्यांना सकाळी १०.१५ वाजता अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. एएस क्लब परिसरातील त्यांच्या निवासस्थानापासून बुधवारी (७ जुलै) सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. बजाजनगर मोहटादेवी मंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुंभारवाडा परिसरातील व्यापाऱ्यांना एकत्र करून त्यांचे संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते या व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते, तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचे सदस्यही ते होते. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने ते पाठपुरावा करीत होते. जुन्या शहरात बाजारपेठेत पोलीस चौकीची आवश्यकता लक्षात घेऊन औरंगपुरा चौकात पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी ५ ते ७ वर्षे सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आपले मोठे बंधू तत्कालीन खा. विजय दर्डा यांचा खासदार निधी आणून औरंगपुऱ्यात पोलीस चौकी उभारली. १० सप्टेंबर २०१३ रोजी पोलीस चौकीचे उद्‌घाटन करण्यात आले. जुन्या पिढीतील काँग्रेसचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. १९९९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा गड असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी भागात त्यांनी एकहाती काँग्रेसचा निष्ठेने प्रचार केला. त्यांचे शहरातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी घनिष्ठ संबंध होते. याचा फायदा त्यांनी शहरातील समस्या सोडविण्यासाठी करून घेतला. खराब रस्ते, पाणीटंंचाई, व्यापाऱ्यांची सुरक्षा याविषयी ते जिल्हा प्रशासन व शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत होते. मेढ क्षत्रिय सोनार समाजाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांची जैन साधू-संतांवर मोठी श्रद्धा होती. त्यांनी अनेक साधू-संतांची सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.