शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात धो-धो पाऊस

By admin | Updated: June 18, 2017 00:11 IST

शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले होते़

 

 

 

 

शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले होते़ तर आनंदनगर, वसंतनगर, हर्षनगर, बाबानगर, नवीन मोंढा, मगनपुरा, यशवंत कॉलेज रस्ता, श्रीनगर, वजिराबाद, बाफना रोड, देगलूर नाका परिसरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते़ नालेसफाई व्यवस्थितरित्या झाली नसल्याने आणि मोठ्या नाल्यातील गाळ, गवत काढले नसल्याने थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी येत आहे़ त्यातच बाबानगर, हर्षनगर आणि वसंतनगर परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते़ या परिसरात असलेल्या शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या हजारो विद्यार्थ्यांना अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यात साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला़ तर काही विद्यार्थ्यांनी साचलेल्या पाण्यात धम्माल मस्ती करीत आनंद लुटला़ तरुण दुचाकीस्वारांनी स्टंटबाजीही केली़यशवंत कॉलेज रस्ता आणि महात्मा फुले शाळेच्या कॉर्नरवर गुडघाभर पाणी साचले होते़ या रस्त्यावर असलेले खड्डे आणि वर आलेले चेंबर्स पाण्यामुळे लक्षात येत नव्हते़ परिणामी अनेक दुचाकीस्वार पाण्यात पडल्याचे पहायला मिळाले़ शिवनगर बायपास, हर्षनगर, नवीन मोंढा, विष्णूनगर परिसरात अनेकांच्या घरात पाणी घुसले़ त्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले़ तसेच रस्त्यावर साचलेला कचरा पाण्याने घरात आला़ वजिराबाद, तारासिंग मार्केट आदी भागातील कचरा पाण्यामुळे रस्त्यावर आला़ दरम्यान, शहरातील रस्त्यावर साचलेले पाणी नाल्यांमध्ये काढून देण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली़ मगनपुरा परिसरात जेसीबीच्या सहाय्याने साचलेले पाणी आणि नाल्या वाहत्या करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते़ दरम्यान, शिवनगर येथील एका नागरिकाने शेजारच्या नाल्यातील कचरा न काढल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून घरात शिरल्याचे सांगितले़ आमची समस्या कोण सोडविणार? असा प्रश्न त्यांना पडला़बच्चे कंपनीला आनंदतासाभरातच रस्त्यासह मैदानांना तळ्याचे स्वरूप आले होते़ रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उड्या मारत बच्चे कंपनीने पावसाचा आंनद लुटला़ स्टेडियम रस्ता आणि महात्मा फुले शाळेतील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बच्चे कंपनी उड्या मारताना आढळून आली़