शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपाला नांदेडात पाठींबा

By admin | Updated: April 9, 2016 00:36 IST

नांदेड : मुंबईच्या जे़ जे़ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात नांदेडच्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही पाठींबा दर्शविला

नांदेड : मुंबईच्या जे़ जे़ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात नांदेडच्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही पाठींबा दर्शविला असून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून येथील ११० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत़ संपातून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आली आहे़जे़ जे़ रुग्णालयातील प्रकरणावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने मुंबई येथे संप पुकारला आहे़ या संपाला पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे़ त्यानंतर मार्डने राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे़ त्यानुसार शुक्रवारपासून राज्यभरातील साडे चार हजार निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत़ त्यात नांदेडातील ११० डॉक्टरांचाही समावेश आहे़ सकाळपासून डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी संपकरी डॉक्टर उपस्थित आहेत़ या संपातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली असून अपघात विभागाच्या ठिकाणी निवासी डॉक्टर कार्यरत आहेत़ याबाबत मार्डचे अध्यक्ष डॉ़ संजय मुत्तेपोड म्हणाले, शासनाने मार्ड संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच संप पुकारण्याची वेळ आली आहे़ राज्यव्यापी संपाला नांदेडातही पाठींबा देण्यात येत आहे़ परंतु अत्यावश्यक सेवेवर या संपाचा परिणाम होणार नाही़ याचीही काळजी घेण्यात येत आहे़ दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे़