शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे नव्हे तर पुण्याचे नाव संभाजीनगर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबादचे नव्हे तर पुण्याचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी येथे ...

औरंगाबाद : औरंगाबादचे नव्हे तर पुण्याचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करुन त्यांना ठार मारण्यात आले. त्यामुळे पुण्याची खूप मोठी बदनामी झाली आहे. ती धुवून काढण्यासाठी पुण्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची गरज आहे.

पुण्याचे नामकरण जिजापूर करा, अशी मागणी पुढे आली आहे, याकडे लक्ष वेधले असता आनंदराज म्हणाले, माॅं जिजाऊंबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यांचे नाव शनिवारवाड्याला देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देण्याची मागणी १९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, हे निदर्शनास आणून देताच त्यांनी सांगितले की, संभाजीनगर हे नाव औरंगाबादला देण्याचे कारण नाही. शिवसेनेने त्याकाळात हिंदू- मुस्लिम अशी दरी निर्माण करण्यासाठी हे राजकारण केले व त्याचा त्यांना फायदाही झाला. पुणे हेच संभाजीनगर या नावासाठी योग्य ठिकाण आहे.

पुण्याचे नाव संभाजीनगर करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे लवकरच पुण्यात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचेही आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले.

एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर यांनी रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे हे भरकटलेले आहेत, अशी टीका केली. आर्थिक व सामाजिक विषमतेला प्रोत्साहन देणाऱ्यांबरोबर जाणे हा आंबेडकरद्रोह होय, असे सांगत भालचंद्र मुणगेकर हे पीईएसचे अध्यक्ष बनणे म्हणजे चौथा गट तयार करणे होय. पीईएसच्या अध्यक्षपदी बौद्ध व्यक्ती असणे सक्तीचे आहे. रामदास आठवले व भालचंद्र मुणगेकर हे हिंदू महार आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्षच होता येत नाही, असा आक्षेप आनंदराज यांनी यावेळी घेतला.

यावेळी संजीव बोधनकर, मिलिंद बनसोडे, आनंद कस्तुरे, सिध्दोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, सुनील मनोरे, पंचशीला जाधव, मनिषा साळुंके आदी उपस्थित होते.