शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नळदुर्गमध्ये कासार यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

By admin | Updated: December 31, 2016 00:15 IST

नळदुर्ग : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नितीन कासार यांची बिनविरोध निवड झाली

नळदुर्ग : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नितीन कासार यांची बिनविरोध निवड झाली असून, स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी पक्षाकडून मुश्ताक कुरेशी, तर काँग्रेस पक्षाकडून विनायक अहंकारी यांची निवड करण्यात आली. न.प. सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेच्या पीठासीन अधिकारीपदी नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे या होत्या. राष्ट्रवादीचे नितीन कासार यांचा एकमेव अर्ज उपाध्यक्षपदी होता. यावेळी कासार यांनी दोन नामनिर्देशन फॉर्म भरले होते. महालिंग स्वामी, दयानंद बनसोडे यांनी सूचक, तर असिफाबेगम काझी व भारती बनसोडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नितीन कासार हे मागील पंचवार्षिक काळात काँग्रेस पक्षाकडून एक वर्षे नगराध्यक्ष होते. दरम्यान, त्यांच्यात व श्रेष्ठीत मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पालिका निवडणूक लढविली होती. स्वीकृत सदस्यपदी निवड झालेले मुश्ताक कुरेशी हे माजी नगराध्यक्ष असून या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीकडून मुश्ताक कुरेशी व महेबूब शेख यांनी नामनिर्देशन भरले होते. या दोघांपैकी मुश्ताक कुरेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर काँग्रेस पक्षाकडून विनायक अहंकारी यांचे एकट्याचेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड करण्यात आली.