शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एन-८ केंद्रात आता फक्त लसीकरण चाचणीची जागा हलवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : ‘लसीकरणासाठी या आणि कोरोना घरी घेऊन जा’, ही एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील परिस्थिती अखेर दूर झाली आहे. ...

औरंगाबाद : ‘लसीकरणासाठी या आणि कोरोना घरी घेऊन जा’, ही एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील परिस्थिती अखेर दूर झाली आहे. येथील कोरोना चाचणी सेंटर बुधवारी युद्धपातळीवर एन-७ येथील मनपा शाळेत हलविण्यात आले. एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात आता फक्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रात अवघ्या २० पावलांच्या अंतरावर लसीकरण आणि कोरोना चाचणी या दोन्ही बाबी सुरू होत्या. लसीकरणासाठी आणि चाचणीसाठी येणाऱ्यांची एकत्रितपणे ये-जा हाेत होती. ‌‘लोकमत’ने या प्रकाराविषयी २४ मार्च रोजी ‘लसीकरणासाठी या अन् कोरोना घरी घेऊन जा’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी येथील कोरोना चाचणी थांबविली. नागरिकांच्या सुविधेसाठी आता एन-७ येथील मनपा शाळेत कोरोना चाचणीचे सेंटर हलविण्यात आले. येथे एका फलकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली. येथील कोविड आरटीपीसीआर, अँटिजन टेस्टिंग सेंटर हे एन-७ येथील मनपाच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख डाॅ. बुशरा सिमी यांनी दिली. एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात २४ तास लसीकरण सुरू असून, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन हाके यांनी सांगितले.

सर्वच केंद्रांना फायदा

जागेच्या अडचणीमुळे लसीकरण आणि चाचणी या दोन्ही प्रक्रिया अनेक केंद्रांवर करण्याचे नियोजन करण्यात येत होते; परंतु त्यातून संसर्ग कशा प्रकारे पसरू शकतो, ही बाब ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर समोर आली. त्यामुळे लसीकरण आणि चाचणी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातील.

फोटो ओळ...

एन-८ येथील आरोग्यवर्धिनी केंद्राबाहेर कोरोना चाचणी सेंटर एन-७ येथे हलविण्यासंदर्भात लावलेला फलक.