शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

एन-७ जलकुंभाला रणरागिनींचा वेढा

By admin | Updated: September 4, 2014 00:54 IST

औरंगाबाद : मिसारवाडी, आंबेडकरनगर भागांत टँकर पोहोचले नसल्याने काही महिलांनी एन-७ जलकुंभावर आंदोलन करून आज स्वत: टँकर नेले.

औरंगाबाद : मिसारवाडी, आंबेडकरनगर भागांत टँकर पोहोचले नसल्याने काही महिलांनी एन-७ जलकुंभावर आंदोलन करून आज स्वत: टँकर नेले. रणरागिनींनी जलकुंभाला वेढा देऊन तेथील यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. गुंठेवारी वसाहतींमध्ये १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराने पाणीपुरवठा सुरू केला आहे. वसाहतींचे पत्ते, मार्ग आणि टँकर पाठविण्याच्या वेळा माहिती नसल्यामुळे कंपनीने नेमलेले टँकर वेळेत जात नाहीत. गौरी गणपतींचा सण आणि त्यातच टँकरने पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागली. त्या उद्रेकातूनच मिसारवाडीतील महिलांनी एन-७ जलकुंभावर आंदोलन केले. १ सप्टेंबरपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे दिली आहे. गुंठेवारी वसाहतींत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे धोरण कंपनीने अजून तरी ठरविलेले नाही. अधिकाऱ्यांनी गप्प बसविलेस्थायी समिती सदस्य संजय चौधरी यांनी आजच्या बैठकीत गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकर येत नसल्याचा मुद्दा लोकमतच्या वृत्ताचा आधार घेत उपस्थित केला. मात्र, शहर अभियंता एस.डी.पानझडे यांनी त्यांना मोघम उत्तर देऊन गप्प केले. शहागंज जलकुंभावर गनमॅनशहागंज जलकुंभावर समांतरच्या ठेकेदाराने अक्षरश: बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमले आहेत. जलकुंभांवर बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमून नागरिकांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी कंपनीने निर्णय घेतला आहे. दरम्यान, नगरसेवक मीर हिदायत अली म्हणाले, हे चुकीचे आहे.