शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माझं नेतृत्व स्वयंभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:00 IST

माझं नेतृत्व स्वयंभू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी सावरगाव घाट येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुसळंब : अनेक संकटे झेलत भगवानबाबांनी जगण्याची शिकवण दिली, तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वंचितांचे रक्षण केले. माझ्याकडे अपेक्षेने पाहणाºया समाजाला आयुष्यात कधी कुणाच्या दावणीला बांधणार नाही. माझं नेतृत्व स्वयंभू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी सावरगाव घाट येथे केले.पाटोदा तालुक्यातील सावरगाव (घाट) येथे आयोजित राष्ट्रसंत भगवानबाबा जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी आ. भीमराव धोंडे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, जि.प.सभापती संतोष हंगे, युधाजित पंडित, माजी आ. केशवराव आंधळे, पाटोदा पंचायत समिती सभापती पुष्पा सोनवणे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील आळंदीकर, ह.भ.प. बुवासाहेब खाडे महाराज, विजय गोल्हार आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांनी केले. त्यानंतर जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कीर्तनाचा त्यांनी लाभ घेतला. संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आदर्श समाजनिर्मितीसाठी संघर्ष अपरिहार्य असल्याचे सांगून स्व.मुंडेंनी वंचित समाजाचे नेतृत्व केले. त्यांनीच समाजाला ओळख दिली.मी विकासाचे, न्यायाचे, सत्यांचे आणि स्वयंभू राजकारण करते, असे सांगितले. तसेच बीड जिल्ह्याचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण केले. पित्याचा वारसा चालवू शकते, हा विश्वास जनतेनेच दिला. मी सावरगावची लेक झालेय, नाथ्रापेक्षाही मला इथे अधिक आनंद होतोय. तुमच्यावर पितृछत्र धरण्याची ताकद भगवानबाबांनी द्यावी, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय गोल्हार, सूत्रसंचालन वि. भा. साळुंके, युवराज वायबसे, शंकरे देशमुख, प्रा. बिभीषण चाटे यांनी केले तर आभार बी. टी. खाडे यांनी मानले.यावेळी ह.भ.प. बुवासाहेब खाडे महाराज, जि. प. सदस्य सतिश शिंदे, मधुकर गर्जे, रमेश पोकळे, उध्दव दरेकर, आदिनाथ सानप, शिवनाथ पवार, सुधीर घुमरे, रामदास बडे, संदीप सानप, प्रा. वसंत सानप, सुदाम सानप, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, तहसिलदार रामेश्वर गोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल भोकरे, उद्धव दरेकर, सत्यसेन सोनवणे, ज्ञानेश्वर जरांगे, बडे, उद्योगपती खटके, नाना ठोंबरे, शिवनाथ पवार, अ‍ॅड. सुधिर घुमरे, मधुकर गर्जे, आबासाहेब पवार, प्रा.लक्ष्मण सांगळे, संतोष मानुरकर, श्रीपती माने, संतोष भालेराव, नवनाथ सानप, अरूण येवले यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.