परभणी : पुरोगामी चळवळीत भरीव योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आल्याचे सांगून सन्मान मेळाव्याचे उद्घाटन आ. जोगेंद्र कवाडे यांनी केले.येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात आयोजित पीपल्स रिपब्किलन पार्टीच्या सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पी. आर. पी. राज्य उपाध्यक्ष बापुराव गजभारे तर प्रमुख पाहुणे म्हणून पक्ष प्रवक्ते चरणदास इंगोले, डी. टी. शिंदे, उत्तम पुजारी, सिद्धार्थ भराडे, बी. एस. लहाने, अरुण गायकवाड, अॅड. अशोक सोनी, पीआरपीचे राज्य सचिव गौतम मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी अॅड. सोनी यांनी आंबेडकरी चळवळीचा आढावा घेत फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीने सन्मान बहाल केल्याचेही सांगितले. या कार्यक्रमात ३२ नागरिकांचा स्मृतीचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. सन्मान मेळाव्यादरम्यान अनेकांनी पक्ष प्रवेश केला. सूत्रसंचालन प्रा. राजकुमार मनवर यांनी केले. यशस्वीतेसाठी उत्तम मुंडे, बाळासाहेब खंदारे, बाळासाहेब पैठणे, भदंत मुदितानंद, वसंतराव गोरे, किशन हजारे, प्रदीप अंभोरे, दत्ता नंद, नारायण ढाले, गोविंद जावळे, भागवत ढाले, शेषराव ढाले, रामराव ढाले, तथागत ढाले, राणू ढाले, सिद्धार्थ भवाळे, मोहन ढाले आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
चळवळीतील माणसांचा सन्मान हाच माझा सन्मान
By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST