शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर घरमालकासह वॉचमनविरूद्ध खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 18:23 IST

जूनी इमारत पाडून बिल्डींग मटेरियल उचलण्याच्या कारणावरुन ठेकेदाराचा खून केल्याप्रकरणी घरमालक आणि वॉचमनविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात तब्बल सव्वा वर्षानंतर हत्या आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

ठळक मुद्दे २३ मे २०१६ रोजी जालिंदर त्रिभुवन यांचे प्रेत छावणीतील लष्कर परिसरात सापडले  होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल नुकताच छावणी पोलिसांना प्राप्त झाला.मृताची पत्नी विजयमाला त्रिभुवन यांनी याविषयी छावणी पोलीस ठाण्यात खूनाची तक्रार नोंदविली.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. १० :  जूनी इमारत पाडून बिल्डींग मटेरियल उचलण्याच्या कारणावरुन ठेकेदाराचा खून केल्याप्रकरणी घरमालक आणि वॉचमनविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात तब्बल सव्वा वर्षानंतर हत्या आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

घरमालक भास्कर क ोल्हे आणि वॉचमन संजय बागूल अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना छावणी  विभागाचे सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर मुंढे यांनी सांगितले की, २३ मे २०१६ रोजी जालिंदर त्रिभुवन यांचे प्रेत छावणीतील लष्कर परिसरात सापडले  होते. तत्पूर्वी २० मे पासून ते बेपत्ता होते. पती हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसांत नोंदविली होती. दरम्यान तीन दिवसाने त्यांचे प्रेत आढळल्यानंतर छावणी पोलिसांनी याप्रकरणी  अकस्मात मृत्यूची नोंद करून मृताचे शवविच्छेदन केले होते. त्यावेळी त्यांच्या शरिरातील काही भाग न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला होता. 

न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल नुकताच छावणी पोलिसांना प्राप्त झाला. घाटीतील शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मृताचा खून झाल्याचे समोर आले. ही बाब मृताच्या नातेवाईकांना कळवून त्यांचे काही म्हणने असल्याचे नोंदविण्यास सांगितले होते. तेव्हा मृताची पत्नी विजयमाला त्रिभुवन(रा. कबीरनगर, उस्मानपुरा) यांनी याविषयी छावणी पोलीस ठाण्यात ९ आॅगस्ट २०१७ रोजी खूनाची  तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी भास्कर क ोल्हे याच्या मालकीच्या मिटमिटा परिसरातील इमारत पाडण्याचे आणि तेथील मटेरियल उचलण्याचे कंत्राट मृत जालिंदर यांना त्यांनी तीन लाख रुपयांत दिले होते. ठरल्यानुसार मयताने इमारत पाडण्यास सुरवात केली. यावेळी इमारतीचे मटेरियल उचलण्यासाठी जालिंदर तेथे गेले असता आरोपींनी त्यांना मटेरियल उचलण्यास कोल्हे यांनी मज्जाव केला. कोल्हे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकावले आणि आणखी एक लाख रुपयांची मागणी केल्याचे नमूद केले. तसेच वॉचमन बागूल यानेही त्यांना धमकावले होते. 

या घटनेनंतर २० मेपासून जालिंदर बेपत्ता होते आणि २३ रोजी त्यांचे प्रेत आढळले. आरोपींनी त्यांच्या डोक्यात काहीतरी मारून  हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत छावणीतील मोकळ्या मैदानात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आणून टाकले असावे,असे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीनुसार छावणी पोलीस ठाण्यात खून आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे हे करीत आहे.