शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांच्या बोनसचे वांधे

By admin | Updated: September 30, 2014 01:31 IST

औरंगाबाद : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीला बोनस मिळण्याचे वांधे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्त प्रकाश महाजन हे हरियाणा येथे निवडणूक निरीक्षक म्हणून गेले आहेत

औरंगाबाद : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीला बोनस मिळण्याचे वांधे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्त प्रकाश महाजन हे हरियाणा येथे निवडणूक निरीक्षक म्हणून गेले आहेत, तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. प्रशासनही निवडणुकीत ड्यूटीवर आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विचार २१ आॅक्टोबरपर्यंत होईल, अशी चिन्हे सध्या दिसत नाहीत. महापौर कला ओझा या स्वत: निवडणूक मैदानात आहेत. उर्वरित पदाधिकाऱ्यांचे नेते उमेदवार आहेत. विरोधी पक्षाचे पदाधिकारी आपापल्या मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. मनपाच्या खर्चाचा ताळमेळ १ सप्टेंबरपासून बिघडला आहे. अंदाजे १२ कोटी रुपये एलबीटीतून जमा झाले आहेत. दरमहा १८ कोटी रुपये एलबीटीतून जमा होतात. पितृपक्षामुळे एलबीटीला फटका बसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी मध्यंतरी केला. ३१ आॅगस्टपर्यंत ३२ कोटी रुपये ठेकेदारांचे, तर सप्टेंबरमधील वेतन आणि कर्जहप्ते व समांतरची देणी मिळून ५६ कोटी रुपये मनपाला लागणार आहेत. त्यातच बोनस व अग्रीम मिळून अंदाजे अडीच कोटी रुपये जास्तीचे लागणार आहेत. २० महिन्यांत पालिकेची घडी कशीबशी बसली होती. मात्र, पथदिवे, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, व्हाईट टॉपिंगचे रस्ते, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यांच्या कामांवर जास्तीचा खर्च झाला. खाजगीकरणातून विकासकामे सुरू झाल्यामुळे मनपाला उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावे लागणार आहेत. गेल्या दिवाळीला चतुर्थ श्रेणीत कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांचा सुट्यांचा मोबदला व २ हजार ४१९ रुपये सानुग्रह अनुदानापोटी असे मनपाने अडीच कोटी रुपये दिले होते. वर्ग-४ च्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हाती २७ हजार रुपये पडले होते. ४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना ती रक्कम अदा करण्यात आली होती. ४वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांना ५ हजार अ‍ॅडव्हान्स, दैनिक वेतनावरील व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १ हजार दिवाळी भेट दिली होती. महिला बचतगट आणि लिंक वर्कर्सला २ हजार दिवाळी भेट, तर दै. वेतनावरील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांना ३ हजार अ‍ॅडव्हान्स दिले होते.