शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:08 IST

औरंगाबाद : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे. यानुसार मुंबई विद्यापीठ विधि अभ्यासक्रमाच्या ५ हजार उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत. त्या उत्तरपत्रिका औरंगाबादेतून तात्काळ तपासून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला; मात्र या प्रयोगामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असूून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल राज्यपालांनी घेत ३१ जुलैपर्यंत सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल लावण्याचे आदेश कुलगुरूंना दिले. यातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉ. देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. राज्याच्या विधिमंडळातही हा प्रश्न गाजत आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपर्यंत निकाल लावणे मुंबई विद्यापीठाला अनिवार्य बनले आहे. यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठांकडे मदत मागितली आहे. सुरुवातीला नागपूरच्या विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुंबईच्या अधिकाºयांनी धाव घेत विधि शाखेच्या ५ हजार उत्तरपत्रिका तपासून देण्याची विनंती केली. या विनंतीनुसार विद्यापीठ प्रशासनाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विधि शाखेच्या १०० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाकडे पाठवली, तसेच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मुख्य ग्रंथालयातील संगणक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यास परीक्षा विभागातील अधिकाºयांनी दुजोरा दिला आहे.