शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
3
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
4
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
5
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
6
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
7
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
10
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
11
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
12
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
13
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
14
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
15
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
16
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
17
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
18
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
19
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

एमएसआरडीसी शहरातून बाहेर...

By admin | Updated: June 9, 2016 23:52 IST

विकास राऊत, औरंगाबाद महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) शहरातील काम आता जवळपास संपले आहे.

विकास राऊत, औरंगाबादमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) शहरातील काम आता जवळपास संपले आहे. सिडको आणि महावीर चौक येथील उड्डाणपूल वाहतुकीला खुले झाल्यानंतर महामंडळ मराठवाड्यातील प्रकल्पांवर काम करण्यासाठी सरसावणार आहे. मराठवाड्यातील ५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर एमएसआरडीसी काम करणार आहे. रस्त्यांच्या कामाच्या निविदा निघाल्या असून, पाहणीचे काम सुरू झाले. शहरातील बहुतांश प्रकल्प नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे वर्ग झाल्यामुळे एमएसआरडीसीला सध्या तरी काम नाही. जालना रोडचे सहा पदरीकरण, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते जयभवानीनगर रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपूल, बीड बायपास रस्ता रुंदीकरण, औरंगाबाद ते पैठण ही कामे एनएचएआय करणार आहे. तसेच शेंद्रा ते वाळूज या रस्त्यासाठीदेखील एनएचएआयकडेच पाहणी करण्याची जबाबदारी आली आहे. जालना रोड रुंदीकरणाचे व त्यावर अंदाजे ५ उड्डाणपूल बांधणीचे काम एनएचएआय करणार असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर ते मुंबई या सुपर हायवेत येणाऱ्या सहा उपनगरांच्या नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे आहे. त्या कामाला उशीर असून, ते काम औरंगाबाद शहरात मोडत नाही.विभागातील बीड ते लातूर आणि मांजरसुंबा ते अहमदनगर, रेणापूर, आष्टी, उदगीर, मंठा ते वाटूर फाटा या रस्त्याच्या द्रुतगती रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसी करणार आहे. आता काय करणार एमएसआरडीसी? बीड, लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्तेएकात्मिक रस्ते विकास योजना २००१ साली जाहीर करण्यात आली होती. या योजनेतील कामे आजवर चालली. त्या योजनेतील भुयारी मार्ग दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला. तसेच अमरप्रीत चौकातील भुयारी मार्गाचा प्रस्तावही पुढे चर्चेला आला नाही. त्यामुळे एमएसआरडीसी आता मराठवाड्यातील रस्ते रुंदीकरणाकडे वळणार आहे. २० हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मराठवाड्यातील रस्ते विकासासाठी मिळाला आहे. त्यातील ५ हजार कोटींची कामे एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आली. एनएचएआयकडे उर्वरित १५ हजार कोटींची कामे असतील.