शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
4
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
5
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
6
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
7
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
8
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
9
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
10
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
11
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
12
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
13
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
14
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
15
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
16
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
17
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
18
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
19
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
20
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू

नवीन तालुक्याच्या हालचाली

By admin | Updated: May 30, 2016 01:16 IST

वाळूज महानगर : शासकीय स्तरावरून स्वतंत्र वाळूज तालुका करण्याच्या हालचाली सुुरू होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

वाळूज महानगर : शासकीय स्तरावरून स्वतंत्र वाळूज तालुका करण्याच्या हालचाली सुुरू होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. गंगापूर तालुक्याची आर्थिक नाडी वाळूज औद्योगिक क्षेत्र असल्याने स्वतंत्र वाळूज तालुक्यावरून दोन परस्परविरोधी गट सक्रिय झाले आहेत. यासंदर्भात वाळूज महानगर वकील संघ कृती समितीतर्फे सोमवारी वाळूज येथील स्मॉल वंडर स्कूल येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून येणाऱ्या काळात हे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.वाळूज महानगरातील नागरिकांना छोट्या-मोठ्या शासकीय कामांसाठी औरंगाबाद, गंगापूर अशा चकरा माराव्या लागतात. या भागात स्वतंत्र रजिस्ट्री कार्यालय, तहसील कार्यालय व न्यायालय उभारण्याची मागणी वाळूज महानगर वकील संघ कृती समितीने पूर्वीच करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आता स्वतंत्र वाळूज तालुका निर्मितीच्या शासकीय स्तरावरून हालचाली सुरू होताच तालुका निर्मितीवरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. गंगापूर तालुक्याची आर्थिक नाडी वाळूज औद्योगिक क्षेत्र आहे. औद्योगिक क्षेत्रासारखा विकसित व जास्तीचा महसूल देणारा भागच दूर गेला तर तालुका आर्थिकदृष्ट्या दुबळा होईल व विकासापासून दूर राहील, या भीतीपोटी तालुक्यातील काही मंडळी अखंड गंगापूर तालुका कृती समितीच्या माध्यमातून स्वतंत्र वाळूज तालुका निर्मितीस विरोध करीत आहेत. दुसरीकडे वाळूज महानगर वकील कृती समिती स्वतंत्र वाळूज तालुका निर्मितीच्या बाजूने उभी राहिली आहे. वाळूज महानगर वकील संघ कृती समितीतर्फे सोमवारी सकाळी १०.३० वाजता वाळूज येथील स्मॉल वंडर स्कूल येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन वकील संघ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. महावीर कांकरिया, योगेश बोहरा, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, जनार्दन निकम, ज्ञानेश्वर बोरकर, सुरेश राऊत, गौतम चोपडा, प्रवीण दुबिले, संतोष लोहकरे, मोहनीराज धनवटे, मनोज जैस्वाल, खालेद पठाण, शिवप्रसाद अग्रवाल आदींनी केले.गंगापूर तालुक्याचे विभाजन होऊन स्वतंत्र वाळूज तालुका झाल्यास या ठिकाणी स्वतंत्र न्यायालय, रजिस्ट्री कार्यालय व तहसील इ. सरकारी कार्यालये निर्माण होतील. याच्याशी निगडित असलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. दुसरीक डे जाणारा महसूल येथेच जमा होईल व विकासकामांना गती मिळेल.