शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस

By admin | Updated: June 6, 2016 00:21 IST

जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने

जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाला. रविवारी दुपारनंतर कडक ऊन असले तरी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. जालना शहरात हलकासा पाऊस झाला. वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी, सोनक पिंपळगाव, पारध, रामनगर, दुधना काळेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वालसावंगी, पारध आदी गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेली. पत्रे उडून गेल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग येईल अशी शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. पावसामुळे ग्रामीण भागात सखल भागात चांगले पाणी साचले आहे. पत्रे उडून जाण्यासोबतच अनेक होर्डिगही तूटून पडले. आठवडी बाजारातही बाजारकरूंसह व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले. वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांत समाधान व्यक्त होत आहे. काही शेतांमध्ये पाणी साचले आहे.आष्टी: परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे फुलवाडी येथील सोपान निवृत्ती वाघमारे यांची गट क्रमांक १९ मध्ये असलेली लिंबोणीची बाग उद्ध्वस्त झाली. यात ३५ झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गोठे तसेच शेती साहित्याचे नुकसान झाले.परतूर तालुक्यातील हातडी, श्रीष्टी, आष्टी ७० पेक्षा अधिक विजेचे खांब पडले आहेत. मुख्य वाहिनीचे दहा ते बारा वीज खांब पडले. दोन रोहित्रांचेही नुकसान झाले. परिणामी परिसरातील ४८ गावे अंधारात बुडाली आहेत. अंधारामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून, महावितरण कंपनीने तात्काळ वीज खांबांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. बहुतांश ठिकाणी विजेच्या खांबांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वादळी पावसात खांब जमीनदोस्त होत आहेत. विशेष म्हणजे रोहित्रेही कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठावर परिणाम झाला आहे. पिठाच्या गिरण्याही बंद आहेत.