शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त

By admin | Updated: June 23, 2014 00:32 IST

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्तपदाचा फटका तेथील विद्यार्थी प्रवेश क्षमता ४० वरून ५० अशी वाढविण्याच्या प्रस्तावाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घाटी रुग्णालयात प्राध्यापकांची ९ पदे मंजूर असून त्यापैकी मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभाग, मुखशल्यचिकित्साशास्त्र विभाग, सामाजिक दंतशास्त्र, बालदंतशास्त्र विभाग आणि बालदंतव्यंगोपचारशास्त्र अशा पाच विभागांतील पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांची २२ पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल १५ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.मुखरोगनिदान विभाग, दंतपरिवेष्ठनशास्त्र, दंतशल्यशास्त्र, बालदंतशास्त्र या विभागांतील प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत, तर कृत्रिम दंतशास्त्र विभागासाठी मंजूर चार पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत, तर अन्य ४ विभागांतही प्रत्येकी एका शिक्षकाचे पद रिक्त आहे. अधिव्याख्यात्यांची ३० पदे मंजूर असून त्यापैकी २८ पदे भरलेली आहेत. यात १८ पदांवर बंधपत्रित उमेदवार कार्यरत आहेत. भारतीय दंत परिषदेच्या पथकातर्फे २६ आणि २७ मे रोजी दंत महाविद्यालयाची तपासणी करण्यात आली. या पथकाने दंत परिषदेला सादर केलेल्या गोपनीय अहवालात येथील प्राध्यापक, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची त्रुटी काढली आहे. तसेच तेथील विविध विभागांत आवश्यक त्या उपकरणांचीही कमतरता असल्याचे नमूद केले आहे. महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये ई-जर्नल उपलब्ध नसल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. काढण्यात आलेल्या त्रुटीची तातडीने पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे पत्रही महाविद्यालयास पाठविण्यात आले होते. सर्व त्रुटींची पूर्तता होणे अशक्य असल्याने या वर्षीही प्रवेश क्षमता वाढण्याची आशा मावळली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.