शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस-आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:28 IST

शहराला रविवारी पावसाचा मोठा तडाखा बसला. अतिवृष्टीचा इशारा असला तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. अपेक्षेपेक्षा चौपट पाऊस झाल्याने शहरात सखल भागात पाणी साचल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:शहराला रविवारी पावसाचा मोठा तडाखा बसला. अतिवृष्टीचा इशारा असला तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. अपेक्षेपेक्षा चौपट पाऊस झाल्याने शहरात सखल भागात पाणी साचल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.शहरातील सर्वच भागात पाणीच पाणी झाले होते. शहरातील श्रावस्तीनगर, समीराबाग, हमालपुरा या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. शहरातील सखल भागातील घरामध्ये संपूर्ण दिवसभर पाणी होते. सायंकाळी पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे या भागातील नागरिकांची चिंता आणखीनच वाढली आहे. चार तासातच मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील संपूर्ण नाले ओव्हरफ्लो झाले. रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. सकाळी ८ वाजेपर्यंत अनेक भाग जलमय झाला होते. दुपारी १२ नंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हे पाणी ओसरले होते. मात्र सायंकाळी ५ नंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने चिंता वाढली होती.राष्ट्रीय मौसम पूर्वानुमान केंद्राने शनिवारी दुपारी दीड वाजता पुन्हा एकदा मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तातडीची बैठक बोलावत अधिकाºयांना सूचना दिल्या. महापालिकेचे उपायुक्त, विभाग प्रमुख, आरोग्य अधिकारी त्यासोबतच महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, स्थायी समिती सभापती मंगला देशमुख यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आयुक्त म्हणाले, महापालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. तराफ्यासह, बॅटरी, दोरी क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले असून बचाव कार्य करताना कोणत्याही साहित्याची कमतरता पडू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.नागरिकांना हलवण्यासाठी ८ टेंपो, ४० मजूरही सज्ज ठेवण्यात आले असून २० जीवरक्षक दलही तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी श्रावस्तीनगर येथील बुद्धविहारातही काही नागरिकांनी आश्रय घेतला आहे.