शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी काँग्रेसकडून लढण्यास ७५ हून अधिक इच्छुक

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

औरंगाबाद : काँग्रेसची उमेदवारी घेऊन लढण्यासाठी इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतून ७५ हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी

औरंगाबाद : काँग्रेसची उमेदवारी घेऊन लढण्यासाठी इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतून ७५ हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशानुसार दि. १ ते १० आॅगस्टदरम्यान इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. पश्चिम मतदारसंघातून तब्बल ३० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यात शहर सरचिटणीस रामकुमार जाधव, महेंद्र रमंडवाल, जालिंदर शेंडगे, आत्माराम बोराडे, चंद्रभान पारखे, रावसाहेब गायकवाड, अ‍ॅड. सुनीता तायडे, भीमराव शेरे, हरिभाऊ शेळके , डॉ. पवन डोंगरे, डॉ. जितेंद्र देहाडे, संजीवनी महापुरे, गौतम माळकरी, क्रृष्णा भंडारे आदींचा समावेश आहे. मध्य मतदार संघातून शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांच्यासह १८ जण इच्छुक आहेत. जेम्स अंबिलढगे, जीएसए अन्सारी, इब्राहिम पठाण, शेख अथर, प्रा. मोहन देशमुख, राजेंद्र दाते आदींचा त्यात प्रमुख समावेश आहे. पूर्व मतदार संघातून विद्यमान आमदार राजेंद्र दर्डा, अहमद हुसेन, अन्वर शेरखान व जीएसए अन्सारी हे चौघे इच्छुक आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांनी दिली. औरंगाबाद ग्रामीण मतदारसंघातील सिल्लोड मतदारसंघातून विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांचा एकमेव अर्ज आहे, तर फुलंब्री मतदार संघातून विद्यमान आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह जाधव या दोघांचे अर्ज आहेत. पैठणमधून रवींद्र काळे, रामनाथ चोरमले, विनोद तांबे, भोसले आदींचे अर्ज आहेत. गंगापुरातून संजय जाधव, श्रीमती जाधव, किरण पाटील, जगन्नाथ खोसरे, शोभा खोरसे, अनिल पटेल हे इच्छुक आहेत. कन्नड मतदारसंघातून अनिल सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, नामदेव पवार, अशोक मगर, उत्तम राठोड, तात्याराव पाटील, गजानन सुरासे आणि वैजापुरातून दिनेश परदेशी, जगन्नाथ जाधव, संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप आदी प्रमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले. हे अर्ज प्रदेश कमिटीकडे उद्या पाठविले जाणार असल्याचे ते म्हणाले. दि. १५ ते २० आॅगस्टदरम्यान पहिली यादी प्रसिद्ध होऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.