शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एसआयटी पथकात आणखी १२ कर्मचाऱ्यांची भर

By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST

शिरीष शिंदे , बीड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष तपासणी पथकाची स्थापना यापुर्वीच करण्यात आली आहे

शिरीष शिंदे , बीडयेथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष तपासणी पथकाची स्थापना यापुर्वीच करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या तपासाचा वेग वाढविण्यासाठी तसेच पारदर्शकात आणण्याच्या उद्देशाने पथकातील एक उपविभागीय अधिकारी व आठ कर्मचाऱ्यांच्या ताफर्यात आणखी सात अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षका विश्वास नांगरे पाटील यांनी तीन बैठका घेतल्या आहेत. विशेष पथकामध्ये पुर्वी अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी नीलेश मोरे व इतर आठ पीय व एपीआयचा समावेश होता. आता नवीन १२ कर्मचाऱ्यांमध्ये माजलगाव येथील सहायक पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांच्यासह धारुर ठाण्याचे पोनि धरमसिंग चव्हाण, नेकनुर ठाण्याचे बाबासाहेब भुसारे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. पोनि चव्हाण यांचे शिक्षण कॉमर्स विषया झाले असल्याने त्यांची निवड झाली असल्याचे समजते. दरम्यान,बीड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १४१ कोटी रूपयांचा घोटाळा झाला होता.या प्रकरणाच्या तपासामध्ये प्रगती नाही, असा ठपका ठेवत हे प्रकरण विशेष तपासणी पथकामार्फत तपासावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले होते. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना पत्र पाठवून पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.रविवारी झाली बैठकअंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात डीसीसी घोटाळ्यासंदर्भात बैठक रविवारी पार पडली. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तपास झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आले. ५० लाख रूपयांपर्यंतचा तपास एपीआय, १ कोटी रूपयापर्यंतचा तपास पीआय तर पाच कोटी रूपयापर्यंतचा तपास डीवायएसपी करणार आहेत.डीसीसीच्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी १३१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी उच्च न्यायालयाला दिली होती. आता पर्यंत या पैकी काही बहुतांश गुन्ह्यांचा तपास पुर्ण झाला असून सात गुन्हे पथकाच्या तपासावर आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत ज्या प्रकरणांचा तपास पुर्ण झालेला आहे त्यांची पडताळी केली जाणार आहे. त्यानंरत उच्च न्यायालयास संपुर्ण गुन्ह्यांचे दोषारोप पत्र सादर केले जाणार आहेत.४दरम्यान, बीड जिल्ह्यातील सादोळा येथील सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य हरिभाऊ सोळंके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. गुन्हे नोंदविलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्याची विनंती सोळंके यांनी याचिकेत केली होती.