शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कडत्यासाठी मोंढा बंद

By admin | Updated: October 15, 2016 00:29 IST

म्ााजलगाव :ऐन सणासुदीच्या तोंडावर अचानक झालेल्या मोंढा बंदमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

म्ााजलगाव : शेतकऱ्यांच्या विक्र ीसाठी आलेल्या मालातून क्विंटलमागे १ किलो नियमबाहय कडता घेण्याची सर्रास पध्दत सुरु असतानाही आणखीन कडता मिळावा, यासाठी मोंढयातील हमाल, मापाडयांनी अचानक मोंढा बंद करुन व्यापारी व शेतकऱ्यांना कोंडीत पकडले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर अचानक झालेल्या मोंढा बंदमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हमाल मापाडयांच्या धोरणाविरोधात बाजार समितीने त्यांना तात्काळ काम सुरु करा अन्यथा लायसन्स रदद करण्याची नोटीस शुक्रवारी बजावली आहे. शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालातून १ किलो प्रमाणे बेकायदेशीर कडता काढून घेतला जात होता. या कडत्याच्या हिस्सेदारीवरुन महिन्यापूर्वी हमालमापाडी व व्यापारी यांच्या वादात तब्बल २२ दिवस मोंढा बंद होता. त्यावेळी बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे, सचिव डी.बी. फुके यांनी मध्यस्थी करुन व्यापाऱ्यांना अर्धा किलो व हमाल मापाडयायंना अर्धा किलो असा तोडगा काढून बाजार पुर्ववत सुरु केला. परंतु पुन्हा हमाल संघटनेने कडत्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या बाजारात शेतकऱ्यांचे धान्य मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याची संधी पाहून हमालांनी बंद पुकारला असल्याचे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे. हमाल, मापाडयांच्या या धोरणामुळे व वाद मिटलेला असतानाही हमाल मापाडयांनी चुकीची भूमिका घेतल्यामुळे हमाल मापाडयांना तात्काळ काम सुरु करा अन्यथा लायसन्स रदद करण्यात येईल, अशी नोटीस बाजार समितीकडुन काढण्यात आली असल्याची माहिती सचिव डी.बी. फुके यांनी दिली. बाजार समितीची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे व हमाल मापाडयांमधून अनेक हमाल मापाडी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण कसे हमाल मापाडयांचे कैवारी आहोत हे दाखिवण्यासाठी पुन्हा जुना मुददा उकरुन काढून व्यापारी व शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा खटाटोप असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. शेतकऱ्यांची मात्र मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)