उस्मानाबाद : महावितरण कंपनीच्या अॅल्युमिनियमच्या तारा चोरल्या प्रकरणात एका आरोपीस विशेष न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तारा चोरीची घटना १० आॅगस्ट २०११ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मंगरूळ गावच्या शिवारात घडली होती़याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दीपक पाटील- मेंढेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ शिवारातील महावितरण कंपनीच्या लघूदाब वाहिनीच्या ०९ पोलच्या अॅल्युमिनियम तारेची १० आॅक्टोबर २०११ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली होती़ याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता जालींदर गणपत कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास गोविंद काळे (रा़ कोलीबेट ता़अक्कलकोट जि़सोलापूर) व इतरांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुरनं ५०/२०११ कलम १३६ भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता़ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणात चार साक्षीदार तपासण्यात आले़ यात फिर्यादी व तपासीक अंमलदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली़ सुनावणीदरम्यान समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दीपक पाटील- मेंढेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी आरोपी भानुदास गोविंद काळे याला भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३६ अन्वये दोषी ठरवून दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तर इतरांची निर्दोष मुक्तता झाली़
एकास सक्तमजुरी
By admin | Updated: February 2, 2016 00:26 IST